लोकशिक्षण संस्थेत माजी विद्यार्थ्यांचा वार्षिक मेळावा ६ मार्चला आयोजन



वरोरा(प्रती) लोकशिक्षण संस्था संचालित शाळा महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी स्थापन केलेल्या लोकमान्य माजी विद्यार्थी संस्थेच्या वतीने दिनांक ६ मार्च २०२२ रोज रविवारला लोकशिक्षण संस्था परिसर वरोरा येथे संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांच्या वार्षिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे ,सदर मेळाव्याचे तीन सत्रात आयोजन करण्यात आले 
असून पहिल्या सत्रात उद्घाटन सोहळा तसेच दुसऱ्या सत्रात परिसंवाद ,आणि तिसऱ्या सत्रात सांस्कृतिक कार्येक्रम घेण्यात येईल,या मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी पुरस्कृत केलेल्या प्रोजेक्टबद्दल सहयोगी  विद्यार्थ्यांचा सत्कार होईल, तसेच मागील वर्षापासून या संस्थेने सुरू केलेल्या "लोकमानस" या त्रैमासिकच्याआजच्या चालू महिन्यातील अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे या मेळाव्यात नवे शैक्षणिक धोरण आणि शाळा पुढील आव्हाने या विषयावर  माजी विद्यार्थ्यांचा परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे तसेच माजी विद्यार्थ्यांची मनोगते, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव वर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा करण्यात आले आहे  मेळाव्यात सहभागी होणाऱ्या माजी विद्यार्थ्यांकडून नाममात्र शुल्क आकारण्यात येईल, माजी विद्यार्थ्यांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आव्हान एका पत्रकार परिषद व्दारा लोकशिक्षण संस्थेचे कार्यवाह श्रीकृष्ण घड्याळ पाटील , लोकमान्य माजी विद्यार्थी संस्थेच्या उपाध्यक्षा  राधा सवाने सचिव अनिल नानवटकर कोषाध्यक्ष प्रा, रवींद्र शेंडे मुख्याध्यापिका कथडे मॅडम  धोपटे मॅडम तसेच गोगटे मॅडम यांनी केले

Post a Comment

0 Comments