शेगाव पोलीस स्टेशनच्या वतीने सायबर जनजागृती सप्ताह ,,,आज मोटार सायकल रॅलीचे आयोजन



वरोरा(प्रती) सायबर गुन्हेगारी ही नवनवीन तंत्रज्ञानाच्या शोधाचा एक प्रमुख दुष्परिणाम आहे सायबर गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात महिला बळी पडताना दिसून येत आहेत ,या सायबर गुन्ह्यातून नागरिकांनी स्वतःला कसे सांभाळले  पाहिजे याविषयी पोलिस स्टेशन शेगावच्या वतीने माकोना येथे दि, 5 मार्च रोजी सायबर जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते,शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार अविनाश मेश्राम यांच्या माध्यमातून शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावातील नागरिकांना जागृत करण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे ,तसेच आज सायबर जनजागृती सप्ताह निमित्य मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे,दि.५  मार्च रोजी माकोना येथे नागरिकांना सायबर गुन्हे संदर्भात होणाऱ्या वेगवेगळ्या सायबर गुन्हे विषयावर माहिती देऊन सतर्क करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले, यावेळी शेगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार अविनाश मेश्राम व त्यांचे सहकारी व मोठ्या प्रमाणात गावकरी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments