सासरच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या
पती, सासू, सासरे यांच्यावर गुन्हा दाखल
दीड वर्षाचा मुलगा झाला पोरका 
भद्रावती (प्रती)सासरच्या जाचाला कंटाळून ए
का विवाहित महिलेने आपल्या राहत्या घरीच गळफास लावून आत्महत्या केली असून  आत्महत्येस प्रवृत्त करणे, हुंडाबळी  कायद्यानुसार पती ,सासू,सासरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, सदर घटना दि,३०/०३/२०२२दु,३:००वाजताच्या  सुमारास घडली.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार शेख अहमद शेख बब्बू शेख(४८) रा.आसोले ले- आऊट आर्वी जि. वर्धा यांची  मोठी मुलगी तसमिया उर्फ झिन त(२२) हिचा विवाह मोहम्मद आमीर आदिल शेख रा,शिवाजी वार्ड भद्रावती जि, चंद्रपूर याच्याशी २०२०मध्ये झाला होता, काही दिवस सुखाचे गेले असता ,सासू व सासरे हे क्षुल्लक कारणावरून सतत तसमियाशी भांडण करत होते ,त्यामुळे पती मोहम्मद आमीर हा तसमियाला मारहाण करायचा, तसमियाचा हा छळ सातत्याने सुरू होता, असा तिच्या वडिलांनी आरोप केला आहे,या कारणामुळे तिच्या आई वडिलांनी तिला आपल्या घरी सुद्धा आणले होते,परंतु काही दिवसांनी तिची समजूत घालून तिला सासरी पाठविले, दि३०मार्च रोजी दुपारच्या सुमारास तिने आपल्या राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली, यामुळे परिसरात खळबळ उडाली होती,  परंतु माझ्या मुलीची सासरच्या लोकांनीच  हत्या केली असा आरोप मृतक तसमिया हिच्या वडिलांनी केला असून तिला दीड वर्षाचा मुलगा आहे ,आरोपी पती सासू आणि सासरे यांच्यावर  भादंवी कलम ३०६,४९८A,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे,

Post a Comment

0 Comments