५ जूनला चंद्रपूरमध्ये राज्यस्तरीय पर्यावरण संमेलनाचे आयोजन

५ जूनला चंद्रपूरमध्ये राज्यस्तरीय पर्यावरण संमेलनाचे आयोजन
----------------------_----------------
चंद्रपूर(प्रती) पर्यावरण संवर्धन व विकास समिती व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर च्या वतीने राज्यस्तरीय पर्यावरण संमेलनाचे आयोजन करण्याचे ठरले असून या पर्यावरण संमेलनासाठी राज्याचे पर्यावरण मंत्री ना. आदित्य उद्धवजी ठाकरे, पर्यावरण राज्यमंत्री ना. संजयजी बनसोडे, जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय भाऊ वडेट्टीवार, संपर्कमंत्री ना. प्राजक्त दादा तनपुरे, चंद्रपूरचे खासदार माननीय बाळूभाऊ धानोरकर, आमदार माननीय किशोर भाऊ जोरगेवार तसेच प्रमुख वक्ते म्हणून प्रसिद्ध कवी व विचारवंत प्राध्यापक ज्ञानेश वाकुडकर नागपूर यांना निमंत्रित करण्याचे ठरले आहे.
आम्ही गेल्या २० वर्षापासून पर्यावरण संवर्धन व विकास समितीच्या वतीने दरवर्षी पर्यावरण संमेलनाचे आयोजन करून त्यानिमित्त निबंध स्पर्धा, सर स्पर्धा, वृक्षारोपण व पर्यावरण विशेषांकाचे प्रकाशनही संमेलनात करण्यात येते. तर पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना पर्यावरण मित्र व पर्यावरण रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते तर सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येते आणि UPSC,MPSC दहावी ,बारावी किंवा इतरही गुणवंत विद्यार्थ्यांचा सुद्धा सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात येते.
तरी 5 जून 2022 ला चंद्रपुरात होऊ घातलेल्या पर्यावरण संमेलनात प्रकाशित होणाऱ्या विशेष अंकासाठी लेख , कथा , कविता व पर्यावरण मित्र व पर्यावरण रत्न पुरस्कारासाठी 20 मे 2022 पर्यंत पर्यावरण संवर्धन व विकास समिती तुकुंम चंद्रपुर या पत्त्यावर प्रस्ताव पाठवावे असे आवाहन पर्यावरण संवर्धन व विकास समितीचे अध्यक्ष डी. के. आरिकर व सचिव हरीश ससनकर यांनी केली आहे

Post a Comment

0 Comments