शिव -शाहू -फुले -आंबेडकरांचे विचार सामाजिक न्याय समतेच्या परिवर्तनाला चालना देऊ शकतात- दाभाडे




पुणे(प्रती)पुरोगामी महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज ,छत्रपती शाहू महाराज,मा ज्योतिबा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार क्रांती प्रदन असून हा विचारच सामाजिक न्याय समतेच्या परिवर्तनाला जालना देऊ शकतात असे बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी परिवर्तनवादी आणि थोर समाज सुधारक मा, ज्योतिबा फुले यांच्या १९५ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यासाठी पुणे गंजपेठ येथील महात्मा ज्योतिबा फुले यांचे राष्ट्रीय स्मारक असलेले (फुले वाडा समता भुमी) येथे सोमवार दिनांक ११ एप्रिल २०२२ रोजी बहुजन जनता दलाच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तेव्हा कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे बोलत होते
 फक्त सामाजिक न्याय आणि समता या मुद्द्यावर न भांडता दलित बहुजनांनी व इतर घटकांनी आर्थिक विकास व प्रगतीसाठी भांडणे आता जास्त आवश्यक झाले असून दलित बहुजनांना आवश्यक कर्ज पुरवठा करणारे सर्वच महामंडळातील भ्रष्टाचारांच्या विरोधात आवाज उठवणे जास्त गरजेचे झाले आहे असेही पंडित दाभाडे यांनी म्हटले आहे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या असलेल्या राष्ट्रीय स्मारक (फुले वाडा समता भुमी) येथील पुतळ्यांना बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी पुष्पहार घालून महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बहुजन जनता दलाचे पुणे जिल्हाध्यक्ष महेंद्र बरकडे यांनी केले तर आभार प्रदर्शन बहुजन जनता दल युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष प्रतिक दाभाडे यांनी केले यावेळी दीपक सुरवाडे जीवन गवळी दादाराव वानखेडे संघरत्न शिरसाट मयूर दांडगे विशाल खंडारे आशिष बरकडे सुभाष सुरवाडे दीपक पाटील सुनील अहिरे बळीराम कांबळे यांच्यासह बहुजन जनता दलाचे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते असे बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी  प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे

Post a Comment

0 Comments