युवा क्रांति सोशल क्लब तर्फे शरबत वितरण

वरोरा येथे युवा क्रांति सोशल क्लब ने बाबासाहेबांच्या रँलीचे केले शरबत वाटुन स्वागत



वरोरा(प्रती) डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या १३१ व्या जयंती निमित्य युवा क्रांती सोशल क्लब तर्फे श्री.अहेतेशाम अली मा.नगराध्यक्ष न.प.वरोरा यांच्या नेतृत्वात बाबासाहेबांचा जयंती निमित्य निघालेल्या मिरवणुकिमधील नागरिकांना शरबत वितरण करण्यात आले. शहरात बाबासाहेबांची जयंती अती उत्साहात मोठ्या थाटा माटात साजरी करण्यात आली. सोबतच अहेतेशाम अली यांनी वरोरा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे असलेल्या महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले.बाबासाहेबांच्या १३१ व्या जयंतीनिमित्तानं समस्त नागरीकांना मनापासून शुभेच्छा दिल्या..!
तसेच डॉ.गुनानंद दुर्गे माजी नगरसेवक यांच्या मित्रपरिवार तर्फे नागरीकांसाठी बूंदा वाटप कार्यक्रमा मध्ये सुद्धा हजर झाले. या संपुर्ण कार्यक्रम प्रसंगी अहेतेशाम अली यांच्या सोबत जेष्ठ नेते बाबासाहेब भागडे,राजुभाऊ गायकवाड जिल्हा परिषद सदस्य,डॉ.गुणानंद दुर्गे,देविदास ताजने,विनोद लोहकरे,आदेश बावने,सुषमा कराड,दुर्गे मॅडम, युवा क्रांति सोशल क्लब चे अनिकेत नाकाड़े,राहुल आत्राम,निखिल श्रीरामे,अभिजित चौधरी,सन्नी रामपुरे,इश्वर ठाकरे,शफीक शेख,अमन नायडू,हाशिम अली,नितिन मानुसमारे अरुण बावने,अनिरुद्ध तेलंग,निखिल शेम्बडकर,निखिल चंदेल,प्राशिल लोखंडे,विकास बुरटकर,पराग तितरे,अराहान सिद्दीकी,आकाश गायकवाड, सोबत शहरातील अनेक सामजिक कार्यकरत्यांनी,पोलिस कर्मचारयांनी माजी सैन्य दल कर्मचारयानी या प्रसंगी भेट देली.या पूर्वी राम नवमी मिरवणुकी मध्ये सुद्धा युवा क्रांति सोशल क्लब तर्फे शरबत वितरण करण्यात आले होते..!


Post a Comment

0 Comments