स्वतंत्र संग्राम सैनिक सुखदेवराव डांगटे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रवेशद्वाराचे लोकार्पण संपन्न

स्वतंत्र संग्राम सैनिक सुखदेवराव डांगटे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रवेशद्वाराचे  लोकार्पण संपन्न   . अकोला (प्रती) स्थानिक जि .प .नगर ,
खडकी बू. अकोला येथील.श्री मधुकररावजी डांगटे व सुधाकररावजी डांगटे या बंधूंनी आपल्या स्वांतंत्र्य सैनिक वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नाभिक बहुउद्देशिय मंडळ, खडकी ला "प्रवेश द्वार"  स्वखर्चातून बांधून प्रदान व समर्पित केले.विशेष म्हणजे त्या प्रवेश द्वाराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी त्या परिवाराने आजीवन स्वीकारली आहे.या प्रवेशद्वाराच्या लोकार्पण सोहळ्याला अध्यक्ष म्हणून माजी महापौर विजय अग्रवाल, उदघाटक  म्हणून डॉ .के .बी .जोशी से.नी. जिल्हा आरोग्य अधिकारी   होते.या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती म्हणून  विनोद मापारी माजी उपमहापौर,नगरसेवक राहुल देशमुख, शारदाताई वैकुंठराव ढोरे , ज्येष्ठ समाजसेवक गजानन हरणे,सौ मंदाताई डांगटे,शंकरराव लंगोटे , प्रवीन हुंडीवाले,देविदासजी अमृतकर, सुनील पांडे,नंदुभाऊ बोपुलकर  गजानन वाघमारे , सामाजिक कार्यकर्ते माजी ग्रामपंचायत सदस्य अनिल हरणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.कार्यक्रमाचे संचालन..... तर आभार प्रदर्शन श्री सुधाकररावजी 
डांगटे यांनी केले. या कार्यक्रमाला परिसरातील  नागरिक ,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते .या कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने  करण्यात आली

Post a Comment

0 Comments