पूज्यनीय भदंत ज्ञानज्योती महास्थविर यांच्या नेतृत्वात भीमजन्मोत्सव अभिवादन पदयात्रेचे आयोजन

अकोला  येथील अशोक वाटिकेतून पदयात्रेचे प्रस्थान* 
कंचनपुर गावातून महू कडे रवाना  
अकोला( प्रतीक शिरसाट) पूज्यनीय भदंत 








ज्ञानज्योती महास्थवीर यांच्या नेतृत्वाखाली भीमजन्मोत्सव अभिवादन पदयात्रा दि.१एप्रिल ते १४एप्रिल२०२२या १३दिवशीय अभिवादन पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे, सदर पदयात्रा ही अकोला ते कंचनपूर अंदुरा ते उखळी, कवठळ ते संग्रामपूर ,जळगाव ते करोळी,बोदली ते दर्यापूर, बुऱ्हाणपूर ते निबाला ,असिरगढ ते दहीनाका बोरगाव ते डोंगरफाटा, देशगाव ते दोडवा ,बासवा ते  मोरटक्का ,पडाळी ते चोरल ,शांतीवन ते अंबाचंदन, हरसोल ते भीमजन्मभूमी महू या प्रमुख गावातून मार्गक्रमण करत १३एप्रिलला महू येथे पदयात्रेचा समारोप होईल,भदंत ज्ञानज्योती महास्थविर आणि पुज्यनिय भिक्खू संघ यांनी कंचनपूर गावात प्रस्थान करताच बौद्ध उपासक आणि उपासीकांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले,  भदंत ज्ञानज्योती यांचे कार्ये  महान असल्याने बौद्ध अनुयायांसाठी ते एक ऊर्जा आहेत,कंचनपूर गावात प्रथमच आगमन झाले असता, तरुण मंडळी मध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते, आजूबाजूच्या गावातील बौद्ध उपासक आणि उपासिका यांना पदयात्रेची माहिती कळताच ,त्यांनी आपली उपस्थिती दर्शविली होती, त्यांच्यासाठी भोजनदानाची व्यवस्था करण्यात आली होती, दुसऱ्या दिवशी२एप्रिलला पहाटे ५;००वाजता पदयात्रा कंचनपूर वरून निघाली असता गावातील बौद्ध बांधवांनी पदयात्रेत  सहभाग घेऊन हातरुण येथे पडयात्रेला निरोप दिला, व कंचनपूर गावातील काही उपासक आणि उपासिका महूला जाण्यासाठी रवाना झाल्या,या पदयात्रेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे,

Post a Comment

0 Comments