वरोरा येथे ग्रामजयंतीसंपन्नआणि वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे पालखी आगमन

वरोरा येथे ग्रामजयंती संपन्न आणि वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे पालखी आगमन



वरोरा(प्रती)गुरुदेव सेवा मंडळ वरोरा चे वतीने दि. २५एप्रिल २०२२सोमवार ला सकाळी ४.३०वा. परिसर स्वच्छता करुन५.३०वा सामुहिक ध्यान व ध्यानावर चिंतन सौ उमा कोहाळे यांचे झाले लगेच नगरातुन वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेसह मिरवणूक  काढण्यात आली रामधुनच्या महत्वावर श्री पुंडलिक कवरासे यांनी विचार प्रकट केले. दु. ११.००वा.श्री गुरुदेव सेवा मंडळ वरोरा उपासकांचे भजनाने काला संपन्न झाला.१२.१५.वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची चरणपादुका पालखीचे आगमन डोंगरावर चौक यैथे होताच पालखी चे स्वागत प्रा. रुपलाल कावळे जिल्हा सेवाधिकारी चंद्रपूर यांनी तसेच मंडळातील महीला भगीनींनी आरती ओवाळुन सर्वांनी दिपारतीची मिरवणुकीत पालखीला गुरुदेव सेवा आश्रम येथे आणण्यात आले मार्गात अनेक भाविकांकडून पालखी पुजन  झाले . श्री गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री लक्ष्मणराव गमे उपसर्वाधिकारी अ.भा. श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम यांच्या हस्ते प्रथम पुजन झाले नंतर वरोरा भद्रावती निर्वाचन क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा. सौ प्रतिभा ताई धानोरकर, श्री अहतेशामजी अली माजी नगराध्यक्ष वरोरा ,. श्री  छोटुभाई शेख नगर सेवक तथा सरचिटणीस अ.भा.कांग्रेस कामगार संघटना, श्री अंकुशजी  आगलावे सामाजिक कार्यकर्ता व विदर्भप्रांताध्यक्ष माहीती अधिकार संघठन, यांनी पालखीचे पुजन करुन मार्गदर्शन केले. मा. लक्ष्मणराव गमे यांनी ग्रामजयंती निमित्ताने गुरुदेव सेवा मंडळ वरोराला वस्तू स्वरुपात भेट दिलेल्या दानविरांचे तसेच श्री गुरुकुंज आश्रम येथे दैनंदिन सुरुअसलेल्या अन्नदानाकरीता रोखस्वरुपात दान दिलेल्या दानदात्यांचे आभारातुन मार्गदर्शन केले.पालखीसह आलेले श्री विठ्ठल राव सावरकर प्रांतसेवाधिकारी , श्री रामराऊतसर जिल्हा संघटक , श्री नत्थुजी भोयर चिमुर तालुकासेवाधिकारी यांचे मंडळाचे वतिने स्वागत करण्यात आले. आरती व कालावाटप आणि मा.
 आमदार सौ . धानोरकर ताई यांच्या सौजन्याने सर्वांच्या स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली  भोजनानंतर पालखी पुढील गावी मार्गस्थ झाली. सायंकाळी सामुदायिक प्रार्थना व प्रार्थनेवर श्री पंडित लोंढे सर ग्रामगीताचार्य यांचे मार्गदर्शन होऊन राष्टवंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष गमे साहेब ,  प्रा. कावळे उपासक  धनंजय कोहाळे,अशोक ठेंगे ,पारोधेसर, अविनाश पिंपळकर, नंदकिशोर खिरटकर सर, लोंढे सर,कानकाटे सर ,  कवरासे सर , बजाज,कुणाल वाटकर, सौ उमा कोहाळे, सौ माला गमे, वनिता सोरते, वनिता उमाटे , सुवर्णा सोरते , छाया कोहाळे, सविता कोहाळै गीता बुराण, श्रीमती मंगला धांदे, तसेच महीला मंडळाचे पदाधिकारी व गुरुदेव उपासक यांनी अथक परिश्रम केले सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपलाल कावळे यांनी केले.

Post a Comment

0 Comments