१७एप्रिल ला वरोरा तालुका पेन्शनर्स असोसिएशन ची आमसभा.

१७एप्रिल ला वरोरा तालुका पेन्शनर्स असोसिएशन ची आमसभा.
  पाच वर्षासाठी कार्यकारी मंडळाची होणार निवडणूक.
 वरोरा(प्रती) 
    येथील वरोरा तालुका पेन्शनर्स बहुऊद्देशीय असोसिएशन वरोरा ची आमसभा आणि कार्यकारी मंडळाची निवडणूक १७एप्रिल रोज रविवारला सकाळी ११वाजता श्री अंबादेवी देविस्थान,अंबादेवी वार्ड वरोरा येथे आयोजित करण्यात आली आहे. पाच वर्षांनी निवडणूक होत असल्याने संस्थेतील नवीन जेष्ठ सभासदांना निवडणुकीच्या माध्यमातून आणि लोकशाही निवडणूक पद्धतीने संचालक होण्याची संधी प्राप्त होत असल्याने सभासदांचे आमसभाकडे लक्ष वेधले आहे.
   मा.सहधर्मदाय आयुक्त चंद्रपूर यांनी निवडणूकीत नोंदणी क्रमांक ६८४नंतरच्या सभासदाना अपात्र ठरविण्यात आल्याने त्यांना सभेच्या कामकाजात सहभागी होता येणार नसून निवडणुकीत सहभागी होता येणार नाहीत असे संस्था अध्यक्ष आबाजी देवाळकर यांनी सर्व सभासदाना सुचित केले आहे. तेव्हा सभासद नोंदणी क्रमांक६८३पर्यंतच्याच सभासदांनीआमसभेला ऊपस्थीत राहण्याचे अध्यक्ष सचिव यांनी आवाहन केले आहे. मतदार यादी सभासद क्रमांक माहित होण्यासाठी अंबादेवी देवस्थानचे सभास्थळी ऊपलब्ध करून देण्यात येणार असल्याने सभासदात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
   आमसभेत १६एप्रिल२२पर्यंतच्या कालावधीत दिवंगत सभासदाना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. सभासदांच्या प्रतिक्रिया व निवडणूक चर्चा झाल्यानंतर लगेचच निवडणूक प्रक्रिया सुरु होणार असल्याचे पेन्शनर्स असोसिएशन चे अध्यक्ष आबासाहेब देवाळकर, सचिव देवराव कांबळे, व कार्यकारी मंडळानी पत्रकाद्वारे आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments