गावा-गावात उद्योग केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न करणार -रमेश राजूरकर

गावा-गावात उद्योग केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न करणार -रमेश राजूरकर
वरोरा(प्रती) देशात बेरोजगारी झपाट्याने वाढत असून रोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे ,त्यामुळे आजचा युवक  रोजगारासाठी  धडपड करताना दिसत आहे ,कुठले क्षेत्र निवडायचे या विवंचनेत असून प्रत्येक युवकांनी आत्मनिर्भर होऊन आत्मसन्मान कमविला पाहिजे ,आपल्या क्षमतेनुसार युवकांनी काम करावे व आपले क्षेत्र निवडून प्रथम प्रशिक्षण घ्यावे, प्रत्येकाच्या हाताला काम मिळवून देऊ  किंबहुना गावागावात उद्योग केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते रमेश राजुरकर यांनी व्यक्त केले 
जय गुरुदेव स्वच्छ जल संस्था वरोरा तसेच संघर्ष इमारत बांधकाम कामगार संघटना बोर्डाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रोजगार तसेच बांधकाम कामगारांना मार्गदर्शन मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते, मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा बँकेचे संचालक रवींद्र शिंदे यांनी केले, अध्यक्षस्थानी अँड. मोरेश्वर टेमुर्डे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचे कार्यकारी अभियंता अमिताभ पावडे उपस्थित होते, यावेळी गवंडी बांधकाम मजदूर युनियनचे अध्यक्ष प्रशांत रामटेके माजी नगराध्यक्ष  अहेतेशाम अली सीएससी महा शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष पांडुरंग गावंडे, दत्ता बोरकर ,प्रतिभा कुंभारे सरपंच सुधाकर रोहणकर आदींची यावेळी उपस्थिती होती कार्यक्रमाचे संचालन प्रा. खुळे सर यांनी केले आभार संस्थेच्या सल्लागार माया राजूरकर यांनी मानले ,मेळाव्यासाठी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ चंद्रपूर चे सहकार्य लाभले मुकुंल  राजूरकर ,पुरुषोत्तम ननावरे आदित्य राजूरकर,गजानन माटे,विजय डवरे ,प्रफ्फुल हुसुकले, मनोज देउळकर,पांडुरंग नागदेवते, आशिष गेडाम, विवेक शास्त्रकार, विकास ठेंगणे, सौरभ पिंपळशेंडे,यादव उईके, तसेच बांधकाम कामगार संघटना बोर्डाचे अध्यक्ष अनिल कुमरे आदींनी परिश्रम घेतले

Post a Comment

0 Comments