आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या उपस्थितीत राहील पटेल सह युवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या उपस्थितीत राहील पटेल सह युवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

वरोरा(प्रती)
शहरातील अनेक युवा कार्यकर्त्यांनी सोमवार १ मे रोजी काँग्रेस पक्षात प्रवेश केला, आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते काँग्रेस पक्षाचे दुपट्टे घालून त्यांचे स्वागत करण्यात आले, अल अमीन सोशल वेल्फेअर संघटनेचे राहील पटेल यांच्यासह पन्नासहून अधिक समर्थकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला यामध्ये संजय लीहितकर ,शकील शेख राकेश जुनघरे ,स्वप्नील लीहितकर ,गौरव भाजीपाले अनिल पवार, नितेश परचाके अकल शेख ,धर्मेंद्र सिंग ,अतिब सय्यद, शहानवाज अन्सारी, सुशांत सोनवणे ,केदार करलुके, अफजल शेख, मनोज खोब्रागडे शशिकांत  विरुटकर ,संजय उपाध्ये ,शुभम गोलाईत यांचा प्रामुख्याने समावेश आहे खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवून आम्ही प्रवेश करत असल्याचे या कार्यकर्त्यांनी सांगितले, पक्ष प्रवेश करणाऱ्या सर्व युवकांची आमदार प्रतिभा धानोरकर यांनी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले ,याप्रसंगी शहर काँग्रेस अध्यक्ष विलास टिपले अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष  सलीम पटेल उपस्थित होते, तुम्ही पक्षासाठी कार्य करा, तुम्ही मोठे झालात तर पक्षही मोठा होईल आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत पोहचून पक्ष बळकट करा असे आवाहन आमदार प्रतिभा धानोरकर यांनी उपस्थितांना केले

Post a Comment

0 Comments