दहावीच्या परीक्षेत फिनिक्स सोनारकरने मारली बाजी




भालेराव पब्लिक स्कुल मधून फिनिक्स प्रथम




बल्लारपूर-भालेराव पब्लिक स्कुल मधून फिनिक्स नरेंद्र सोनारकर या विद्यार्थ्यांने मार्च महिन्यात संपन्न झालेल्या १० वीच्या परीक्षेत ९३.८० टक्के गुण घेऊन शाळेतून पहिला येण्याचा मान पटकावला आहे.पुरेसे शैक्षणिक संसाधन नसतांना बिकट आर्थिक स्थितीत त्याने संपादित केलेल्या यशा बद्दल त्याचे कौतुक होत आहे.
फिनिक्स हा पत्रकार नरेंद्र सोनारकर यांचा एकुलता एक पुत्र असून,त्याचा यशा बद्दल त्याची आई रुपाली सोनारकर,हर्षल नवघरे सर,भालेराव पब्लिक स्कुलच्या मुख्याध्यापक सीमा भास्करवार मॅडम,सीमा पांडे मॅडम,हेमलता जयस्वाल मॅडम यांनी विश्वास दर्शविला होता.त्यांच्या विश्वासावर खरे उतरल्याचा फिनिक्स ला आनंद आहे.
त्याला आय.आय.टी. ला जायचे असून,त्याने आपल्या यशाचे श्रेय विषभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना, वडील नरेंद्र सोनारकर,आई रुपाली सोनारकर ,शाळेतील सर्व शिक्षक मंडळी यांना दिले आहे.त्याच्या यशा बद्दल राज्याचे माजी वित्त, नियोजन,वनमंत्री सुधीर मुनगंटीवार,पुरोगामी साहित्य संसदेच्या जिल्हा अध्यक्षा योगिता रायपुरे,डॉ.शीतल सोनारकर,पुरोगामी पत्रकार संघाचे विदर्भ संघटक निलेश ठाकरे,आंबेडकरी आंदोलनाचे नेते पवन भगत,डॉ.भाष्कर सोनारकर इत्यादींनी त्याचे अभिनंदन केले असून उज्ज्वल भविष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या आहे.

Post a Comment

0 Comments