भाजपा हा महिलांना गुलाम बनवून पाहातय-अमर गोंडाने


        
       भाजपा हा महिलांना गुलाम बनवून पाहतयं-अमर गोंडाने

 
वरोरा;-अमरावती येथे पत्रकार परिषदेत युवक काँग्रेस चे प्रदेश प्रवक्ता अमर गोंडाने यांनी पत्रकारांना संबोधित करतांना भारतीय जनता पक्षला महिलांचं स्वतंत्र बघवत नाही. भाजपा महिलांना गुलाम बनवून पाहतायत असे वक्तव्य पत्रकार परिषेदेत केले
      काही दिवसाआधी भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना उद्देशून सुप्रिया सुळेनी घरात फक्त स्वयंपाक करावा अस वक्तव्य केल होत. याचं वक्तव्याच्या प्रती उत्तरांत भाजपा हा महिलांच्या स्वतंत्र विरोधात आहे...त्यांना महिलांना चुल आणी मूल याचं चौकटीत स्त्री जातील ठेवायचे आहे असे ते म्हणाले
पुढे बोलतांना ते म्हणाले की आज भारत देशाला स्वतंत्र मिडून 70 वर्ष झालीत. मात्र 2014 नंतर सत्तेत आलेल्या मोदी सरकार नी या देशात हुकूमशाही सुरु केली आहे... आपल्या संविधानिक अधिकाराचा उपयोग करणाऱ्या आंदोलनकारी शेतकऱ्यांना लखीमपूर खिरी येथे गाडी ने चिरडून टाकून संवविधानीक अधिकाराची हत्त्या केली गेली. युवकांचा आवाज दाबण्याचं काम केंद्रीय सरकार करत आहे. ..म्हणजे इथल्या सर्व घटकांवर जुलूम करण्याचं काम मोदी सरकार करत आहे.
    या अन्याय अत्याचाराला वाचा फोडून भाजपाचा खोटा आणी खोडसाळपणा भोंगळा पाडून सर्व सत्य संपूर्ण जेनतेसमोर यावं यासाठी युवक काँग्रेस यंग इंडिया के बोल या स्पर्धेच आयोजन करत आहे; कारण या स्पर्धेतून निवड झालेले स्पर्धक प्रदेश प्रवक्ता तथा राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून आपली जबाबदारी पार पाडतील व इथल्या वंचित शोषित पीडित जेनतेचा आवाज बनतील तसेच त्यांच्या न्यायासाठी हक्कासाठी अधिकाराचा अधिकारासाठी आपली भूमिका बजावतील..
      या स्पर्धेची माहिती देतांना युवक काँग्रेस प्रदेश प्रवक्ता अमर गोंडाने,अमरावती जिल्हाध्यक्ष पंकज मोरे,शहर अध्यक्ष निलेश घुमे,स्पर्धेचे अमरावती-अकोला- यवतमाळ जिल्हा मुख्य परीक्षक मा. भोंगडे गुरुजी तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते...

Post a Comment

0 Comments