गौरव देवयानीचा .. वरोऱ्याची देवयानी गोव्यात झळकली !राज्यातून दूसरी...

'भारत एक श्रेष्ठ भारत 'या सांस्कृतिक स्पर्धेत देवयानी सुगंधा पाचभाई राज्यातून दुसरी




वरोरा(प्रती) :गोवा राज्यात नुकत्याच झालेल्या भारत श्रेष्ठ भारत या आयोजित सांस्कृतिक स्पर्धेत वरोरा शहरातील अरविंद विद्यालय निकेतनची विद्यार्थिनी राज्यातून दुसरी आली असून तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कु. देवयानी सुगंधा पाचभाई
हि विद्यार्थिनी अरविंद विद्या निकेतन सुभाष वार्ड वरोरा या इंग्रजी माध्यम शाळेत इयत्ता ९ मध्ये शिकत असून गोवा राज्यात झालेल्या 'भारत एक श्रेष्ठ भारत' या सांस्कृतिक मंत्रालय द्वारा आयोजित कार्यक्रमात भाग घेतला होता

गोवा राज्यात ही आंतर स्पर्धा घेण्यात आली होती. त्यात तिने दुसरा क्रमांक प्राप्त करून आपल्या शाळेचे आणि वरोरा शहराचे नाव उज्वल केले. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांची देवयानी पाचभाई हिला शिल्ड व प्रमाणपत्र देवून तिचा गौरव केला.

यात भाग घेण्यासाठी सुगंधा पाचभाई तिचे नृत्य दिग्दर्शक महेश सर, अरविंद विद्यानिकेतन शाळेचे प्राचार्य विनोद पिदूरकर उपप्रचार्य स्मिता घडोले यांनी तिचे अभिनंदन केले. देवयानीने आपल्या यशाचे श्रेय प्राचार्य विनोद पिदूरकर उपप्रचार्य स्मिता घडोले, संस्थेचे प्रेसिडेंट अमर मोरेश्वर टेंभुर्डे यांना दिले आहे.

Post a Comment

0 Comments