जयदीप सोनखासकर यांना राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर

जयदीप सोनखासकर यांना राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर


अकोला:-इंदिरा गांधी नगरपरिषद माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक जयकुमार उर्फ जयदीप शंकरराव सोनखासकर यांना अखिल भारतीय ग्रामीण पञकार संघातर्फे राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार-२०२२ जाहीर झाला आहे.याबाबतीत निवडपञ व निमंत्रण त्यांना प्राप्त झाले आहे. 
   सोनखासकर यांच्या शैक्षणिक व क्रीडा कार्य  तथा ' शिक्षणविश्व' या शिक्षकप्रिय वृत्तपत्र स्तंभलेखनासाठी हा प्रतिष्ठित पुरस्कार घोषीत झाला आहे.
   येत्या ८ आगस्ट सोमवारी त्यांना हा पुरस्कार राम गणेश गडकरी रंगायतन ठाणे,मुंबई येथे महामहीम राज्यपाल भगतसींग कोश्यारी,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंञी देवेन्द्र फडणवीस,माजी मंञी जितेन्द्र आव्हाड,आ.संजय केळकर,आ.निरंजन डावखरे,ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर व पञकार संघाच्या केन्द्रीय पदाधिकारी यांचे उपस्थितीमध्ये भव्य सोहळ्यात प्रदान करण्यात येईल.
   जयदीप सोनखासकर यांना याआधी राज्य शिक्षक पुरस्कारासह विविध पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे राज्यकोषाध्यक्ष  तथा निर्भय बनो जन आंदोलनाचे संयोजक गजानन हरणे यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन करून   त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत

Post a Comment

0 Comments