वरोरा येथे महिला बचतगटाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीचा कार्यक्रम संपन्न


वरोरा (प्रति)
 जिजाऊ-सावित्री-मूक्ता-महिला बचत गट शाखा वरोऱ्यांच्या वतीने  दि. २५/८/२०२२ रोजी दुपारी २ वाजता सुदर्शन भवन वरोरा येथे लोकशाहीर  अण्णाभाऊ साठे जयंतीचा कार्यक्रम संपन्न झाला.  मा .उल्हास वानखेडे सराचा अध्यक्षतेखाली पार पडला प्रमूख पाहूणे मा. प्रा नरेद्र खडसे सर, मा .जाधव सर मुख्य मार्गदर्शक मा. शिंदे सर उपस्थित होते कार्यक्रमाची सूरुवात महापूरुषाच्या प्रतिमेचे पूजन  करून भाषणाद्वारे पाहूण्यानी मार्गदर्शक केले शिंदे सरानी आपल्या भाषनातून समाजातील महिलानी उद्योग व्यवसाय क्षेत्रात पुढाकार घेवून स्वत:चा कूटूबांचा, समाजाचा आर्थिक विकास व्हावा त्याकरीता महिलानी पूढे यावे असे मत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंजू खंडारे,रेणूका बावणे,लक्ष्मी बावणे,राधिका बावणे,पल्लवी खंडारे,कविता बावणे,गटाच्या इत्तर ही महिलानी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता तसेच खूशाल बावणे,मनोज खंडारे यांनी  पण कार्यक्रमासाठी प्रयत्न केले.

Post a Comment

0 Comments