वरोरा तालुका भाजपाच्या वतीने पूरग्रस्तांना मदतीचा हात देवराव भोंगळे आणि डॉ. भगवान गायकवाड मदतीला धावले

वरोरा तालुका भाजपाच्या वतीने पूरग्रस्तांना मदतीचा हात
     देवराव भोंगळे आणि डॉ. भगवान गायकवाड मदतीला धावले


वरोरा(प्रति) काल दि. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्राच्या अमृत महोत्सव प्रसंगी वरोरा तालुक्यातील खापरी टाकळी या गावांना भेट देऊन वरोरा तालुका भाजपाच्या वतीने अन्न धान्याच्या किट वाटप करण्यात आल्या.
            या वर्षी  भरपूर प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे . या पावसामुळे एकदा-दोनदा पूर येऊन गेले, लोकांच्या घरात पाणी शिरले, अन्य धान्य खराब झाले. घरे पडली, जनावरे माणसे वाहून गेली, पुरा पश्चात रोगराई आली, पिके नष्ट झाली. सर्व बाजूंनी भयंकर हाहाकार झाला. सर्व शेतकरी हवालदिल झाला. अश्या वेळी रस्त्याकाठच्या गावांमध्ये प्रशासन पोहोचले. नेते पोचले. मदत पोहोचली. लोकांना धीर मिळाला. पण या सर्व धामधुमीत  वरोरा तालुक्यातील डोंगरगाव रेल्वे जवळील खापरी टाकळी हे गाव मदतीपासून वंचित राहिले. तेथील घरे सुद्धा माणूसभर पाण्यात उभी होती. लोकांच्या डोळ्यात अश्रू होते. पण ते पुसणारे हात त्यांच्यापर्यंत पोचले नाहीत. अशा वेळेस लोकनेते सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने देवराव भोंगळे  भाजपा जिल्हा अध्यक्ष  व डॉक्टर भगवान जी गायकवाड भाजपा जिल्हा उपाध्यक्ष यांच्या सहकार्याने अन्नधान्याची किट मदत रूपाने खापरी टाकळी गावात पोचविले. यामध्ये ज्या 25 ग्रामस्थांच्या घरात पाणी शिरले होते त्यांना अन्नधान्य कीट देण्यात आली. याप्रसंगी सुधीर भाऊंना सामान्य गोरगरीबा बद्दल असणारी तळमळ दिसून आली. तसेच देवरावजी भोंगळे व डॉ.  भगवान गायकवाड यांचे जिल्ह्यातील तालुक्यातील लहान-सहान गावांमध्ये असलेल्या समस्यांकडे बारीक नजरेने लक्ष ठेवण्याचे कौशल्य दिसून आले. या सर्व बाबी घडवून आणण्यात  मधुसूदन टिपले निशिकांत डफ राजू दाते भटाळा खुशाल पाटील सोमलकर मोरेश्वर कुत्तरमारे हरिदास चौधरी या लोकांचा मोलाचा सहभाग होता. याप्रसंगी संतोष कन्नाके यशवंत कन्नाके सरस्वती बावनकर रत्नाकर कुळसंगे विजय कुळसंगे गिरजा कुळसंगे मोतीराम कुळसंगे सुनिता आत्राम महादेव येटे, राजू येटे, मिराबाई येटे, अविनाश उईके, नाना आत्राम, भास्कर पेंदोर. देविदास परचाके, अरुण किन्नाके बालाजी किन्नाके बंडू मडावी नारायण कुलसंगे, दिगंबर परचाके, विश्वेश्वर आत्राम विमल येटे, सुरेश सोयाम या लोकांना मदत देण्यात आली.

Post a Comment

0 Comments