शिल्प निदेशक रमेश तावाडे यांचा स्नेहमीलन सोहळा




सेवा पूर्ती
शिल्प निदेशक रमेश तावाडे यांचा स्नेहमीलन सोहळा
वरोरा(प्रती)शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथील शिल्पनिदेशक रमेश बळीराम तावाडे हे नुकतेच सेवानिवृत्त झाले असता , सेवापूर्ती प्रित्यर्थ आज दि.११/०९/२२रोजी चिंतामणी हॉल वरोरा येथे स्नेह मिलन सोहळा संपन्न झाला,
रमेश तावाडे सर अत्यंत मनमिळावू स्वभावाचे, ते आय टी आय मध्ये कार्यरत असतांना,विविध कार्येक्रमामध्ये त्याचा सहभाग असायचा, आपल्या प्रेमळ स्वभावामुळे त्यांनी मित्रांची एक फौजच  निर्माण केली असावी असे आज पार पडलेल्या स्नेहमीलन सोहळ्याच्या कार्येक्रमामध्ये दिसून आले,
रमेश तावाडे सर हे दि,१२/०९/१९८८ मध्ये शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वणी येथे शिल्पनीदेशक या पदावर प्रथमच  रुजू झाले, त्यानंतर सिंदेवाही, गडचिरोली, वरोरा, कोरपना, येथे त्यांनी आपली सेवा दिली, आणि शेवटी चंद्रपूर येथे ४वर्ष आपल्या सेवेचे पूर्ण करून दि.३१/०८/२०२२ रोजी ते सेवानिवृत्त झाले,
रमेश तावाडे सर तसे यवतमाळ जिल्ह्यातले परंतु गेल्या २१ वर्षांपासून ते वरोरा येथे वास्तव्यात आहेत, आज झालेल्या स्नेहमीलन सोहळ्याला जेष्ठ साहित्यीक आणि कवी  आचार्य ,ना.गो. थुटे सर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते, या दिमाखदार सोहळ्याला रमेश तावाडे सर यांचे जुने मित्र ,सोबत काम करणारे त्यांचे सहकारी,आणि वरोरा शहरातील अनेक परिवारांची आणि मान्यवरांची उपस्थिती होती,

Post a Comment

1 Comments