वरोरा पोलिसांनी केले शांततेचे आवाहन

वरोरा पोलिसांनी केले शांततेचे आवाहन
गुंडप्रवृत्तीच्या ४० जणांवर जिल्हाबंदी



वरोरा (प्रती )वरोरा पोलीस स्टेशन अंतर्गत दिनांक 8 /9 /2022 पासून गणपती विसर्जनास सुरुवात झालेली आहे, विसर्जना दरम्यान पोलिसातर्फे नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे, तसेच गणपतीचे विसर्जन शांततेत पार पाडावे अशी विनंती केली आहे, विसर्जन शांततेत  पार पाडण्यासाठी गुंड प्रवृत्तीच्या व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर कलम 144 सीआरपीसी प्रमाणे कार्यवाही करून त्यांना दिनांक 8/ 9 /2022 ते 11./9./2022 पर्यंत जिल्ह्याचे बाहेर जाण्यासाठी 40 लोकांवर गणपती दरम्यान जिल्ह्यात राहण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे, सदरचा प्रतिबंधित आदेश आयुष नोपानी (भापोसे) सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांनी आदेश काढलेला असून 40  लोकांवर आदेश बजावण्यात आलेला आहे, तसेच गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक आणि शांतता भंग करणारे लोक यांच्यावर कलम 107 ,116(3 )अन्वये प्रतिवृत्त पाठविण्यात आलेले आहे ,असे 13लोकांकडून चांगल्या वागणुकीचे अंतिम  बंधपत्र घेण्यात आलेले आहे तसेच विसर्जनादरम्यान कुठलाही अदखलपात्र/ दखलपात्र गुन्हा करू नये म्हणून कलम १४९ सीआरपीसी प्रमाणे 113 इसमांना शांतता राखण्यासंबंधी नोटीस तामील करण्यात आलेला आहे ,असे एका प्रसिद्धीस केलेल्या पत्रकात म्हटले आहे

Post a Comment

0 Comments