रमेश राजूरकर यांनी दिले विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमाचे धडे

रमेश राजूरकर यांनी दिले विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमाचे धडे

वरोरा(प्रती)दहावी आणि बारावी नंतर काय?असा प्रश्न परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना नेहमीच पडतो, त्यावर मार्ग कसा काढायचा या बाबत रमेश राजूरकर यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले,
 दि,. १५/०९/२०२२  ला स. १०.०० वाजता  नेहरू विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, शेगाव येथे जय गुरुदेव स्वच्छ जल संस्थेच्या वतीने १० वी आणि १२ वी मधील विद्यार्थ्यांकरिता रोजगार व करिअर मार्गदर्शन कार्यक्रम ठेवण्यात आला होता कार्यक्रमांमध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून जय गुरुदेव स्वच्छ जलसंस्थेचे अध्यक्ष  रमेश महादेवराव राजूरकर उपस्थित होते. 
दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्याकडे करिअर करण्यासाठी अनेक पर्याय असतात .परंतु दहावीनंतर आपण कोणता कोर्स निवडावा यावर हे तुमचं पुढील भवितव्य  अवलंबून असतं .दहावीनंतर विद्यार्थी विविध व्यवसायिक अभ्यासक्रम करू शकतात .दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये आयटीआय अभ्यासक्रम देखील खूप लोकप्रिय आहे. आयटीआय मध्ये बरेच ट्रेड असतात, ज्यातून विद्यार्थी त्यांच्या आवडीने विषय निवडू शकतात. विद्यार्थी नेहमी लोकप्रिय कोर्सकडे धाव घेतात .मग त्या कोर्समधून हजारो मुल शिक्षण घेतात .त्यातील अनेक बेरोजगाराच राहतात.याउलट  .काही वेळा  काही विशिष्ट व्यावसायिक कोर्ससाठी हुशार मुलं प्रवेशही घेत नसल्याने अवघ्या ४० टक्के मिळालेल्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश मिळतो आणि त्यांना नोकरीची ही संधी चालून येते .तेव्हा नीट विचार करून पर्याय निवडा.असे राजूरकर म्हणाले, करिअरसाठी तुमच्याकडे भरपूर संधी उपलब्ध आहेत .पण फक्त नोकरी करण्याच्या विचाराने त्याकडे पाहू नका. मनात कायम जिज्ञासा ठेवली असता,झोकुन काम केलं तर चिकाटी ,प्रामाणिकता ,गणितवृत्ती ठेवली तर  यश मिळू शकते .चांगल्या मार्गाने पैसे कमवण्याचा विचार आणि व्यवहार ही वृत्ती ठेवली पाहिजे. तरुणांना स्वयंरोजगार निर्माण करता येईल, या हेतूने शासनाने पॉलीटेक्निक कोर्स सुरू केले .मात्र शासकीय तसंच खाजगी संस्थांमधून बाहेर पडणारी मुले केवळ नोकरीचाच विचार करतात, स्वतः उद्योग सुरू करून इतरांना नोकरी देत नाहीत ,त्यामुळे नोकऱ्यांचा तुटवडा निर्माण होतो.
 केवळ पैसा याबाबतीने करिअरचा विचार मर्यादित नसावा .तुमच्याकडे असलेली क्षमता, मिळणार ज्ञान, क्षेत्रातील आव्हान तसेच तुमच्या अभ्यासाचा उपयोग हे पाहून करिअर निवडावं .असे प्रतिसाद जय गुरुदेव स्वच्छ जलसंस्थेचे अध्यक्ष  रमेश राजूरकर
 यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये केले.यावेळी बऱ्याच विद्यार्थ्यांची उपस्थित होती,

Post a Comment

0 Comments