मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली रमेश राजूरकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

मिशन विदर्भ
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली रमेश राजूरकर यांच्या निवासस्थानी  सदिच्छा भेट
रत्नमाला चौकात जंगी स्वागत







वरोरा(प्रती) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेचे जेष्ठ नेते रमेश राजूरकर यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली असता ,यावेळी  त्यांचे स्वागत करण्यात आले,तत्पूर्वी राज ठाकरे यांचे रत्नमाला चौकात  ढोल ताशांच्या गजरात शेकडो कार्येकर्त्याच्या उपस्थितीत जंगी स्वागत करण्यात आले.
राज ठाकरे हे १९ आणि २० सप्टेंबर रोजी चंद्रपूरच्या दौऱ्यावर आहेत, एक दिवस आधी सोशल मीडियावर दौरा रद्द झाल्याच्या बातम्या येत होत्या, परंतु आज अचानक चंद्रपूर दौरा निश्चित झाल्याने, मनसे कार्येकर्त्यांची  चांगलीच धावपळ उडाली असल्याचे चित्र दिसत होते, राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी मनसेच्या शेकडो कार्येकर्त्यांची रत्नमाला चौकात ३वाजल्या पासूनच  गर्दी केली होती, सायंकाळी ६:३०च्या सुमारास राज ठाकरे यांचे वरोरा येथे आगमन झाले, आणि लगेच राज ठाकरे यांनी मनसेचे जेष्ठ नेते रमेश राजूरकर यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली,आणि चंद्रपूरला रवाना झाले,
पत्रकारांचा मात्र हिरमोड

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे तब्बल ९ वर्षानंतर  चंद्रपूर दौऱ्यावर येणार म्हणून  वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील मनसेचे शेकडो कार्येकर्ते त्यांच्या स्वागतासाठी आतुरतेने त्यांची वाट बघत होते, आणि राज ठाकरे यांना  बघण्यासाठी इतर नागरिकांनीही  रत्नमाला चौकात एकच गर्दी केली होती,
त्याच बरोबर स्थानिक पत्रकारही उपस्थित होते, रमेश राजूरकर यांच्या निवासस्थानी राज ठाकरे काही तरी प्रतिक्रिया देतील म्हणून पत्रकारही उत्सुक होते, परंतु प्रकृतीचे कारण समोर करून राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली, त्यामुळे पत्रकारांचा हिरमोड झाल्याने, काही पत्रकांरानी बोलून दाखविले, एक मात्र निश्चित राज ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे मनसे च्या शेकडो कार्येकर्त्यामध्ये नवी उभारी निर्माण झाली असून  येणाऱ्या महानगर पालिका आणि नगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि संघटन मजबूतीकरणं आणि संघटनात्मक बांधणी करण्यासाठी राज ठाकरे हे विदर्भ दौऱ्यावर आले असल्याचे बोलल्या जातअसून राज ठाकरे मनसे कार्येकर्त्यांच्या,व पदाधिकाऱ्यांच्या यादरम्यान बैठका घेणार असल्याची माहिती आहे,

Post a Comment

0 Comments