आनंदवनात २९ कर्णबधिरांना डिजिटल श्रवण यंत्राचे वाटप

आनंदवनात २९ कर्णबधिरांना डिजिटल श्रवण यंत्राचे वाटप




वरोरा(प्रती) मा.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 72 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून  तसेच आजादीचा अमृतमहोत्सव निमित्ताने  दि.17/09/2022 ला आनंद मूकबधिर विद्यालय आनंदवन,वरोरा येथे कर्णबधिर व्यक्तींना मोफत डिजिटल श्रवणयंत्र वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात 24 शाळेतील विद्यार्थी व 5 इतर कर्णबधिर व्यक्ती अशा एकूण 29 कर्णबधिर लाभार्थांनी या योजनेचा लाभ घेतला.
         अलियावर जंग राष्ट्रीय श्रवणविकलांग संस्था , मुंबई या संस्थेची उपशाखा असलेल्या सी.आर.सी. नागपूर यांच्या  माध्यमातून दिव्यांगासाठीच्या एडिप योजनेतून  या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या  कार्यक्रमाच्या आयोजनात सी. आर.सी.नागपूरचे  डाॅयरेक्टर श्री.प्रफुल्ल शिदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तर  श्रवणयंत्र वितरण करण्यासाठी सी.आर. सी.नागपूरचे वाचा व श्रवण उपचार तज्ज्ञ श्री.भूषण गावंडे उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महारोगी सेवा समिती वरोराचे विश्वस्त श्री. सुधाकर कडू यांनी भूषविले.संधिनिकेतन अपंगाची कर्मशाळा आनंदवनचे अधिक्षक श्री.रवींद्र नलगिंटवार व आनंद मूकबधिर विद्यालय आनंदवनचे मुख्याध्यापक श्री. विजय भसारकर  प्रामुख्याने उपस्थित होते.
        या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता शाळेचे वाचाउपचार तज्ज्ञ श्री. रविकांत घोलप यांचे नियोजन व मार्गदर्शन महत्वपूर्ण ठरले. शाळेतील सर्व शिक्षक  कर्मचा-यांनी मोलाचे योगदान दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. उमेश घुलक्षे यांनी केले तर हा सर्व कार्यक्रम भाषा खूणा पद्धतीने कर्णबधिर मुलांपर्य॔त पोहचवण्याचे काम कु. सीमा बावणे यांनी केले.             या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव मा.डाॅ.विकासभाऊ आमटे, डाॅ.सौ.भारतीताई आमटे यांचे आशीर्वाद प्राप्त झाले. संस्थेचे विश्वस्त मा. श्री कौस्तुभ आमटे व  सौ. पल्लवीताई आमटे यांचा सहयोग लाभला. कर्णबधिर व्यक्तींना श्रवणयंत्र मिळावे याकरिता अशा कार्यक्रमाचे आयोजन वेळोवेळी  करण्याचा सी.आर.सी.नागपूर व म. से. स.चा मानस आहे.

Post a Comment

0 Comments