मा.शरद पवार यांचे विचार गावागावात पेरून संघटन बांधणी करा-महेबूब शेख


ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष अशफाक् शेख यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश



वरोर(प्रती)राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केलेले कार्य आणि त्यांचे विचार गावागावात, तळागाळातील तरुणा प्रयन्त पोहचवा आणि पक्षाची संघटनात्मक बांधणी करा, असे मत राष्ट्रवादीचे युवा प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी आज पार पडलेल्या शरद युवा संवाद यात्रा दौऱ्या दरम्यान वरोरा येथील नगर भवन येथे व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाला युवा प्रदेश कार्याध्यक्ष नितीन भटारकर, विलास नेरकर ,राजेंद्र ताजने,अभिजित कुडे,दिनेश मोहारे, चंद्रकांत कुंभारेआणि इतर मान्यवर उपस्थित होते,
मेहबूब शेख पुढे म्हणाले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील तमाम जनतेला खोटे आश्वासन देऊन वेठीस धरणाचे काम केले अशा प्रस्थापित नेत्यांचा आणि पक्षाचा नाकर्तेपणा तळागाळातील  तरुणापर्यंत पर्यंत पोहोचल्यास इथला तरुण जागा होईल,
देशाचे नेते शरचंद्रजी पवार यांनी विविध घटकांसाठी कार्य केले आहे दूरदृष्टी असणारे नेते शरद पवार यांचे कार्य आणि विचार आज तरुणात पेरण्याची गरज आहे असे मत त्यांनी व्यक्त केले
ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार अशफाक शेख यांनी आज शरद युवा संवाद यात्रा दौरा कार्यक्रमात मेहबूब शेख यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला त्याचबरोबर दाऊद खान व इतरही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेश केला,
सदर कार्येक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व असंख्य कार्येकर्ते उपस्थित होते,

Post a Comment

0 Comments