डॉक्टर आरोग्य तज्ञ तर फॉर्मसिस्ट औषधी तज्ञ-सुनिल सातपुते

डॉक्टर आरोग्य तज्ञ तर फॉर्मसिस्ट औषधी तज्ञ-सुनिल सातपुते

आज जागतिक फार्मासिस्ट दिवस



वरोरा(प्रती) फार्मासिस्ट हा पेशंट आणि डॉक्टर यांच्यामधील मुख्य दुवा असून डॉक्टर आरोग्य तर फार्मासिस्ट हा औषधी तज्ञ असतो अशी प्रतिक्रिया आज जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त वरोरा तालुका केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष सुनील सातपुते यांनी व्यक्त केली ,
सिद्धिविनायक डी फॉर्म कॉलेज   वरोरा व वरोरा तालुका केमिस्ट संघटना वरोराच्या वतीने आज दि .२५/०९/२०२२रोजी जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त शहरातील मुख्य मार्गावरून रॅली काढण्यात आली होती, सदर रॅलीमध्ये कॉलेजचे विद्यार्थी  तसेच संघटनेचे पदाधिकारी व सदस्य यांचा सहभाग होता,
जागतिक फार्मासिस्ट दिवस  जगभरात आरोग्य सुधारण्यासाठी फार्मासिस्टच्या भूमिकेचा प्रचार आणि समर्थन करण्यासाठी २५ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो.हा दिवस फार्मासिस्टचे महत्त्व आणि भूमिका याविषयी जागरूकता पसरतो. हा दिवस जगातील फार्मसिस्टने केलेल्या सेवांचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. विशेषतः महामारीच्या वेळी दयाळूपणे आणि सहानुभूतीने सेवा देणाऱ्या सर्व फार्मासिस्टना श्रद्धांजली वाहण्यासाठी आठवण  करून देते. 
फार्मसिस्ट औषधांचे महत्व सांगून  ,लोकांना ती कशी घ्यावी त्याबद्दल सल्ला देतात. जागतिक फार्मसिस्ट दिनानिमित्त वैद्यकीय तज्ञांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आणि वैद्यकीय जगतात फार्मसिस्टची महत्वाची भूमिका लोकांना समजावी यासाठी जगभरात अनेक उपक्रम आयोजित केले जातात. 
आज काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये वरोरा तालुका केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष सुनील सातपुते, सचिव नितीन मोरे ,सुरेश भट विशाल जाजू , संजय सारडा,उमेश बोंगीलवार तसेच सिद्धिविनायक डी फार्म कॉलेजचे प्राचार्य डॉ. हितेश बाथे, प्रसाद कथडे ,प्रवीण भोयर ,अमोल बदखल, संदीप उमरे ,सुनील पवार ,प्रेम मुंजनकर,दारू'डे आणि विदयार्थी यांची  उपस्थिती होती,

Post a Comment

0 Comments