दोन मुलाची हत्या करणाऱ्या बापानेही केली आत्महत्या

दोन मुलाची हत्या करणाऱ्या बापानेही केली आत्महत्या
साखरा शिवारातील शेतात सापडला मृत्यूदेह


वरोरा(प्रती)
वरोरा शहराला अगदी लागून असलेले बोर्डा हे गाव आहे, शालिमार ट्रेडर्स च्या मागील बाजूस प्रतीक गॅस एजन्सी बोर्डा या परिसरात संजय श्रीराम कांबळे त्याची पत्नी व त्यांची दोन मुले किरायाच्या खोलीत राहत होते, संजय हा खासगी शिकवणी वर्ग घेत होता तर त्याची पत्नी सविता ही सिद्दीविनायक डी फार्म कॉलेजला प्रयोगशाळा परिचर या कत्रांटी पदावर कार्यरत होती, आज दि,२/९/२०२२रोजी दुपारच्या सुमारास संजय कांबळे याने अस्मित कांबळे(७)आणि मिस्टी कांबळे(४)या  दोन्ही चिमुकल्याना विष पाजले व दार बंद करून तो घरून पसार झाला. आई घरी आल्यानंतर दार उघडून पाहताच दोन्ही मुले बेडवर पडून होती व त्यांच्या नाका तोंडातून फेस येत होता, आईने आरडाओरड सुरू केली असता. काही नागरिकांनी दोन्ही मुलांना उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे उपचारासाठी दाखल केले, मात्र तोपर्यन्त दोन्ही मुलांची प्राणज्योत मावळली होती, सदर हत्येमागील ठोस कारण समोर आले नसून प्राथमिक अंदाजानुसार विष पाजल्यांनंतर हत्या केल्याचा अंदाज वर्तविल्या जात आहे, घटनेच्या काही तासातच आज पहाटेच्या सुमारास ४:००वाजताच्या दरम्यान संजय कांबळे याने आपल्या साखरा (ता. समुद्रपूर जि. वर्धा)गावच्या शेतशिवारात आत्महत्या केल्याची पोलीस सूत्रांकडून खात्रीपूर्वक माहिती मिळाली .परंतू दोन मुलाची हत्या करून बापानेही आत्महत्या का करावी? हा प्रश्न अनुत्तरित असून हे आता पोलीस तापसातच निष्पन्न होईल.

Post a Comment

0 Comments