रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी पप्पू पाटील(रडके)यांना केले सन्मानित


वरोरा (प्रती)वरोरा येथील नगरपरिषद कर्मचारी श्री पप्पू पाटिल (रड़के) गेल्या 52 वर्षा पासून स्वतः चे घरी गणेश उत्सव साजरा करत आहेत. वैशिष्ट्य हे कि गणेश उत्सवाच्या निमित्याने ते समाजाला जागरुकता करणारे आवश्यक असलेले विषय घेऊन दर वर्षी घरी स्वतः सार्वजनिक मंडळाप्रमाणे मोठं मोठे देखावे तयार करुन समाजात आवश्यक जागरूकता प्रसारित करित असतात, यात त्यांचे कुटुंबातील प्रत्येक सदस्य गुंतला असतो ते हा उपक्रम तन मन धनाने कुठली ही देंणगी गोळा न करता अविरत चालवत आहेत, गणेशउत्सवा दरम्यान सार्वजनिक मण्डळात असावी इतकी गर्दी त्यांचे घरी असते . त्याचे या सामाजिक भानाची व कार्याची दखल घेत आज रोटरी क्लब वरोरा ने त्यांना सम्मानित केले व सोबतच त्यांचे मातोश्री चे 71 वर्षात पदार्पणा निमित्य त्याना शाल श्रीफल देऊन अभिष्टचिन्तन केले.सदर कार्यास रोटरी क्लबचे नितेश जैस्वाल ,पराग पत्तिवार,अदनान सिद्धिकोट,अमित नाहर,योगेश डोंगरवार,विजय पावड़े,जितु मत्ते, राहुल पावड़े,सचिन जीवतोड़े,नूतन जुनघरे प्रामुख्याने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments