गजानन हरणे यांचा ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय तर्फे सत्कार

गजानन हरणे यांचा ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय तर्फे सत्कार     
                  
अकोला(प्रती) जिल्ह्यामध्ये गेल्या तीस वर्षापासून अनेक सामाजिक संस्था ,संघटनेच्या माध्यमातून समाजसेवा करीत असलेले अनेक पुरस्कार प्राप्त समाजसेवक तथा पत्रकार  मा.गजानन ओंकार हरणे ,जिल्हा परिषद नगर, खडकी  बु अकोला यांचा ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय शाखा मोठी उमरी अकोला येथे शाल ,श्रीफळ ,पुष्पगुच्छ देऊन गौरव ,सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक काशिनाथ चौधरी हे होते तर सेंटरच्या स्वाती दीदी  प्रमुख उपस्थिती म्हणून तर  ब्रह्मा कुमार अशोक देशमुख, नरेंद्र पूनकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी गजानन हरणे यांनी माउंट आबू येथे पाच दिवसीय पत्रकार संमेलनात भाग घेऊन यशस्वी केल्याबद्दल त्यांच्या सत्काराचे व अनुभव कथनाचे कार्यक्रमाचे आयोजन या सेंटरवर करण्यात आले होते  . यावेळी गजानन हरणे यांनी आपल्या पाच  दिवशी माउंट आबू येथील आलेले अनुभव कथन करून लोकांची मने जिंकून घेतली. या कार्यक्रमाला उमरी परिसरातील ईश्वरी विश्वविद्यालयाचे सर्व महिला ,पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांच्या अनुभवाचा लाभ घेतला . कार्यक्रमाची सागता ब्रह्मभोजनाने करण्यात आली.        

Post a Comment

0 Comments