आनंदवनात दिव्यांग व्यक्तींना वैश्विक ओळखपत्राचे ( UDID Card ) वाटप

आनंदवनात दिव्यांग व्यक्तींना वैश्विक ओळखपत्राचे ( UDID Card ) वाटप 



वरोरा(प्रति) स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व सेवा पंधरवाड्याच्य्  निमित्ताने  दि.26/09/2022 ला समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर व पंचायत समिती वरोरा यांचे सौजन्याने दिव्यांग व्यक्ती वैश्विक ओळखपत्राचे ( UDID Card ) वाटप शिबीर आनंद मूकबधिर विद्यालय आनंदवन,वरोरा येथे घेण्यात आले. संपूर्ण देशातील दिव्यांग (अपंग)  व्यक्तीसाठी online अपंग प्रमाणपत्र देण्यात येते. त्यासोबतच त्यांना UDID कार्ड वितरित केल्या जातात यालाच वैश्विक ओळखपत्र तसेच स्वावलंबन कार्ड सुद्धा म्हटले जाते.  शासनाच्या विविध योजनाचा लाभ घेण्यासाठी या कार्ड चा  उपयोग होतो.  आजच्या UDID कार्ड  वितरण समारंभाला विशेष अतिथी म्हणुन मा. श्री. संदीप  गोडशलवार गट विकास  अधिकारी,  पंचायत  समिती वरोरा  हे  होते  तर  कार्यक्रमाचे  अध्यक्षस्थानी  आनंद मूकबधिर विद्यालय आनंदवनचे मुख्याध्यापक श्री. विजय भसारकर यांनी भूषविले. तसेच प्रमुख पाहुणे  म्हणून आनंदवन  ग्रामपंचायत च्या सरपंच मा. सौ.  वाळके ,  उपसरपंच  श्री.  शौकत अली खान, ग्रामसचिव श्री.  चाफले साहेब , संधिनिकेतन अपंगाची कर्मशाळा आनंदवनचे अधिक्षक श्री.रवींद्र नलगिंटवार , आनंद अंध  विद्यालय, आनंदवनचे मुख्याध्यापक  श्री. सेवकराम  बांगडकर, आनंद मूकबधिर विद्यालयाचे वाचा उपचार तज्ञ  श्री.  रविकांत घोलप हे  उपस्थित होते. 
  या प्रसंगी  मा. श्री.  संदीप  गोडशलवार यांच्या शुभहस्ते  उपस्थित  सर्व  दिव्यांग  व्यक्तिंना,  विद्यार्थ्यांंना  UDID कार्ड  वितरण करण्यात आले.  तसेच पंचायत समिती अंतर्गत दिव्यांग 5 टक्के  निधीचा योग्य लाभ लाभार्थीना देणार तसेच इतर आवश्यक  मदत करण्याचे आश्वासन साहेबानी दिले. तसेच  आनंदवनातील आनंद मूकबधिर विद्यालय,  आनंद अंध विद्यालय,  संधी निकेतन अपंगांची कर्मशाळा यांना भेट देऊन सविस्तर माहिती जाणून घेतली . कर्णबधिर व  अंध विद्यार्थ्यांसोबत  संवाद साधला व  त्यांची विशेष  भाषा  व  लिपी  समजावून  घेतली व  विद्यार्थ्याचे कौतुक केले. 
     या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता शाळेचे वाचा उपचार तज्ज्ञ श्री. रविकांत घोलप यांचे नियोजन व मार्गदर्शन महत्वपूर्ण ठरले.  तसेच शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचा-यांनी मोलाचे योगदान दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. उमेश घुलक्षे यांनी केले तर हा सर्व कार्यक्रम भाषा खूणा पद्धतीने कर्णबधिर मुलांपर्य॔त पोहचवण्याचे काम कु. सीमा बावणे यांनी केले.   तर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री.  प्रल्हाद ठक यांनी केले  या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव मा.डाॅ.विकासभाऊ आमटे, डाॅ.सौ.भारतीताई आमटे यांचे आशीर्वाद प्राप्त झाले. संस्थेचे विश्वस्त मा. श्री कौस्तुभ आमटे व  सौ. पल्लवीताई आमटे यांचा सहयोग लाभला.

Post a Comment

0 Comments