आज रोटरी सारेगमप विदर्भ स्तरिय गीत गायन स्पर्धेची अंतिम फेरी

आज रोटरी सारेगमप विदर्भ स्तरिय गीत गायन स्पर्धेची अंतिम फेरी 

रोटरी क्लब वरोराचा स्तुत्य उपक्रम

संगीत कलाप्रेमींना मेजवानी



वरोरा(प्रती) रोटरी क्लब वरोराच्या वतीने स्व.संजयबाबू देवतळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ,श्री करण देवतळे प्रायोजित रोटरी विदर्भस्तरीय सारेगमप प्रवास सप्तसुरांचा या गीत गायन स्पर्धेची अंतिम फेरी आज दि.१५ऑक्टोबर२०२२रोजी सायं६:००ते१०वाजताच्या दरम्यान डॉ, बाबासाहेब आंबेडकर चौक वरोरा येथे घेण्यात येणार आहे,सदर गीत गायन स्पर्धेच्या कार्येक्रमाला विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत,
दि.९/१०/२०२२ला आशीर्वाद मंगल कार्यालय वरोरा येथे विदर्भ स्तरिय गीत गायन स्पर्धेचा ऑडिशन राऊंड घेण्यात आला होता,, त्यामध्ये १०० पेक्षा अधिक स्पर्धेकांनी आपला सहभाग नोंदविला होता, काही स्पर्धेकांनी गाण्याचे व्हिडिओ पाठविले होते तर उपस्थित स्पर्धेकांनी आपली गीते सादर केली, या सर्व स्पर्धेकामधून २२गायकांची(स्पर्धकांची) निवड करण्यात आली, आज दि.१५ऑक्टोबर रोजी ग्रँड फिनाले असून या फेरी मध्ये २२स्पर्धकांनाही आपल्या गीताचे सादरीकरण करावे लागेल, या गीत गायन स्पर्धेला तज्ञ परीक्षक तसेच प्रसिद्ध असलेले म्युझिशियन लाभले असून सदर कार्येक्रमाचा संगीत कला प्रेमींनी लाभ घ्यावा असे आव्हान रोटरी क्लबचे पराग पत्तीवार ,अदनान सिद्दीकोट, योगेश डोंगरावर, आनंद बेदरकर, नितेश जयस्वाल, राहुल पावडे, नाना माटे, अभिजित मणियार, मनोज कोहडे, जित्तु मत्ते, नूतन जुनघरे,प्रफ्फुल कांबळे यांनी केले आहे,

Post a Comment

0 Comments