भोंगाडे गुरुजींची सावनेर तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती

भोंगाडे गुरुजींची सावनेर तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती

सहकार भारती तर्फे सावनेर तालुका कार्यकारणी गठीत



नागपूर(प्रती)
             सहकार भारती तर्फे दिघोरी चौक येथील सेलिब्रेशन हॉल येथे कार्यकर्ता अभ्यासवर्ग हा कार्यक्रम पार पडला. याचं कार्यक्रमाच औचित्य साधून सहकार भारती चे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री विवेक जुगाडे यांनी सावनेर तालुका कार्यकारणी गठीत केली असून तालुकाध्यक्ष पदी मा. संदीप भोंगाडे गुरुजि ( संचालक रुद्र महिला पत संस्था ) यांची नियुक्ती केली. तसेच मा. गुलाबराव छवारे तालुक्का महामंत्री व मा. अनिल गोमकाळे यांची उपाध्यक्ष पदी नियुक्ती करून संपूर्ण कार्यकारणी गठीत  करण्यात आली.
          कार्यकारणीच्या जबाबदारीची वाहतांना तालुक्यातील सर्व संस्थांच्या अडी अडचणी दूर करणार असल्याचे या वेळी भोंगाडे गुरुजी बोलत होते. 
      या प्रसंगी मा. विवेक जुगादे ( महामंत्री सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश ) , विनोद भिमानवार , संजय रोकडे , चंद्रशेखर लांडे , दीपक वाघ , रामेश्वर ढोके आदी पदाधिकारी उपस्थित होते.
         तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल अमर गोंडाने , रोशन कापसे यांनी भोंगाडे गुरुजींचे अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments