अध्यक्षपदी दुसऱ्यांदा प्रा.प्रविण खिरटकर तर सचिवपदी डॉ. प्रशांत खुळे

वरोरा तालुका पत्रकार संघाची कार्येकारिणी घोषित

अध्यक्षपदी दुसऱ्यांदा प्रा.प्रविण खिरटकर तर सचिवपदी डॉ. प्रशांत खुळे



वरोरा(प्रती) 
गेल्या अनेक वर्षांपासून वरोरा तालुका पत्रकार संघ हा कार्यरत आहे, सदर पत्रकार संघाच्या माध्यमाद्वारे विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी स्पर्धा परीक्षा, आरोग्य शिबीरे, वृक्षारोपण, विविध विषयांवर व्याख्याने, समाजातील गरजूंना मदत, असे विविध सामाजिक उपक्रम पत्रकार संघाच्या माध्यमातून राबविले जातात, मागील दोन ते तीन वर्षांपासून लोकमतचे तालुका प्रतिनिधी प्रा.प्रविण खिरटकर हे पत्रकार संघाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत होते आज दि.२०/११/२०२२रोजी दु. .१२वाजता  शरयू हॉटेल वरोरा येथे कार्येकरिणीची निवड करण्यात आली,यामध्ये प्रा,. प्रविण खिरटकर यांची दुसऱ्यांदा अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर सचिवपदी डॉ, प्रशांत खुळे यांची निवड करण्यात आली, तालुका पत्रकार संघाची उर्वरित कार्येकरिणी जशीच्या तशीच ठेवण्यात आली, सभेचे अध्यक्ष म्हणून वरोरा तालुका पत्रकार संघाचे ज्येष्ठ सदस्य नागरी येथील पत्रकार ईस्तेखा पठाण यांनी जबाबदारी सांभाळली,प्रा. खिरटकर व डॉ. खुळे सर यांच्या निवडीबाबत ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष अशफाक् शेख, सचिव सुनिल शिरसाट, उपाध्यक्ष फैज पटेल हितेश राजनहिरे, संजय गायकवाड, विश्वदीप गोंडाने, मुजाहिद कुरेशी, अहेफाज शेख, जेष्ठ पत्रकार ऍड. अकील अख्तर, व इतर सदस्य यांनी पुढील कार्या साठी शुभेच्छा दिल्या

Post a Comment

0 Comments