दिशा जुनिअर कॉलेज व्हॉलीबॉल संघ विजयी




वरोरा(प्रती)दिशा जुनिअर कॉलेज व्हॉलीबॉल संघ विजयी
वरोरा तालुका क्रीडा संकुल वरोरा येथे शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे  एकोणवीस वर्षीय मुलांच्या व्हॉलीबॉल  स्पर्धेत दिशा जुनिअर कॉलेज द्वारका नगरी वरोराचा संघ विजयी ठरला
19 वर्षाखाली मुलांच्या वॉलीबॉल स्पर्धेत दिशा जुनिअर कॉलेज संघाने अंतिम सामन्यात आनंदनिकेतन ज्युनिअर कॉलेज चा पराभव करीत अजिंक्यपद मिळवले दिशा जुनिअर कॉलेज संघ प्रथमच जिल्हास्तरीय सामन्याकरिता पात्र ठरला आहे दिशा जुनिअर कॉलेज संघा मध्ये केलेले खेळाडू ओजस खिरटकर संस्कार पावडे जय बेदरकर गौरव राजुरकर क्षितिज कामगाडगे आदित्य पोटे अनिकेत मालेकर शुभम विरदांडे उदय वंजारी यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत विजेतेपद पटकाविले खेळाडू आपल्या यशाची श्रेय दिशा जुनिअर कॉलेजचे प्राचार्य संदीप ठाकरे प्राध्यापक गणेश पावडे संघाचे व्यवस्थापक आशिष बोढे प्राध्यापक व कर्मचारी वृंद तसेच प्रशिक्षक तथा स्फूर्ती स्पोर्टिंग क्लबचे ज्येष्ठ खेळाडू चिन्मय कावरे व स्फूर्ती स्पोर्टिंग क्लब वरोरा चे प्रशिक्षक ज्येष्ठ खेळाडू व स्फूर्ती स्पोर्टिंग क्लबच्या पदाधिकारी व सदस्यांना देतात

Post a Comment

0 Comments