इतिहास जाणला तर इतिहास घडविता येतो- उमेशजी लाभे

अभाविप वरोरा शाखेतर्फे भगवान बिरसा मुंडा जयंती व जनजातीय गौरवदिन 

इतिहास जाणला तर इतिहास घडविता येतो-
उमेशजी लाभे



वरोरा(प्रती)अभाविप वरोरा तर्फे स्थानिक  
शिवाजी सायन्स अँन्ड आर्ट्स काँलेज, वरोरा येथे भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त तरुणांकरिता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी प्रमुख वक्ता म्हणून लोकमान्य प्राथमिक शाळेचे अध्यापक श्रीमान उमेशजी लाभे सर यांनी विचार प्रगट केले की, इतिहास घडविण्यासाठी राष्ट्राचा उज्ज्वल इतिहास जाणून घेणे तरुणांचे प्रथम कर्तव्य आहे. 
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी सायन्स अँड आर्ट्स काँलेजचे मा.अध्यक्ष डॉ. निखिल लांबट यांनी उपस्थितांना आवाहन केले की, विद्यार्थ्यांनी राष्ट्र आणि समाज कार्यात सक्रिय भूमिका निभावून समाजहीताकरिता शिक्षण घेतले पाहिजे.
                   मा.उमेशजी लाभे सर पुढे म्हणाले की, भगवान बिरसा मुंडा जयंतीच्या शुभेच्छा या केवळ आदिवासी बांधवांना न देता सर्व भारतीयांना दिल्या पाहिजे. जननायक बिरसा मुंडा यांनी जल,जमीन व जंगल यांच्या संरक्षणासाठी इंग्रज सरकारशी केवळ पारंपारिक शस्त्राच्या आधारावर यशस्वी लढा देऊन या मातृभूमिचे संरक्षण केले आहे. अशा भारतीय महापुरुषांचे कार्यक्रम जाती धर्माच्या बंधनात गुरफटून आपण प्रगती करू शकत नाही. महापुरुषांच्या निधनाने त्यांचे विचार संपत नसून समाज घटकांच्या आचरणातून त्यांना सदैव जिवंत ठेवणे आपण सर्वांचे कर्तव्य असते.
समाजद्रोह्यांच्या विरोधात ही आग सतत तेवत ठेवणे या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने अत्त्यावश्यक आहे.
सद्यस्थितीतील नक्षलवाद, राष्ट्रविद्रोह, विघटनवाद संपुष्टात आणण्यासाठी केवळ शासकीय योजना पुरेशा नाहीत तर समाजाने जनजाती संस्कृतीचा आदर करून सर्वांना मुख्य राष्ट्रप्रवाहात आणणे आजच्या काळाची गरज आहे. याकरिता भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांना प्राधान्य देणे गरजेचे आहे.
सदर कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून शिवाजी सायन्स अँड आर्ट्स काँलेजच्या प्राचार्या श्रीमती. ज्योती मोगरे या होत्या. त्यांनी याप्रसंगी भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनातील प्रेरक कार्याचा विद्यार्थ्यांना परिचय करुन देताना आपल्या जीवन प्रवासातील हे महापुरुष खरे नायक असले पाहिजे असे मार्गदर्शन केले. याप्रसंगी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. वनिता नंदगवली यांनी पण समाज व राष्ट्रहीताचे संस्कार देण्याचे दृष्टीने अशा कार्यक्रमांची गरज असल्याचे सांगून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे कौतुक केले.
या प्रसंगी मंचावर उपस्थित अभाविप वरोरा शाखेचे अध्यक्ष श्रीमान गुरुदेव जुमडे सर यांनी प्रास्ताविकपर भाषण करताना सांगितले की,
सद्व्याच्या स्वार्थी राजकीय परिस्थितीत तरुणांनी भारतीय महापुरुषांच्या विचारांना आपल्या दैनंदिन जीवनात उतरविणे गरजेचे असून याकरिता अशा कार्यक्रमांचे आयोजन महत्त्वाचे असते तसेच राष्ट्र विचाराने प्रेरित विद्यार्थ्यांचे सशक्त संघटन होणे गरजेचे आहे.
कार्यक्रमाचे संचलन कु.मोनिका टिपले हीने केले तर अभाविप वरोरा नगरमंत्री कु.गौरी येळणे हीने पाहुण्यांप्रती आणि शिवाजी काँलेज संचालक मंडळाप्रती आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता अभाविप वरोरा कार्यकारिणीतील कार्यकर्त्यांनी महत्वाची भूमिका पार पाडली. सदर कार्यक्रमात उच्च माध्यमिक काँलेजचे विद्यार्थी तसेच अभाविप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकूणच सदर कार्यक्रम सामाजिक समरसता निर्माण करण्याच्यादृष्टीने महत्वपूर्ण ठरल्याचे मत उपस्थित सर्वांकडून व्यक्त करण्यात आले.

Post a Comment

0 Comments