दिशा जुनियर कॉलेज व्हॉलीबॉल संघाची भरारी

    दिशा जुनियर कॉलेज व्हॉलीबॉल संघाची भरारी 


जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक





वरोरा  (प्रती)शालेय 19 वर्षाखालील व्हॉलीबॉल जिल्हास्तरीय स्पर्धा जिल्हा स्टेडियम चंद्रपूर येथे घेण्यात आल्या  त्यात वरोरा येथील दिशा जुनियर कॉलेज मुलांच्या संघाने अंतिम सामन्यात भद्रावती संघाचा पराभव करीत प्रथम क्रमांक पटकाविला असून
दिशा जुनिअर कॉलेज हॉलीबॉल संघ नागपूर विभागीय स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे विजयी संघात ओजस खिरटकर ,संस्कार पावडे, जय बेदरकर ,क्षितिज तामगाडगे ,गौरव राजूरकर ,उदय वंजारी, अनिकेत मालेकर ,आदित्य पोटे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत प्रथम स्थान पटकाविले दिशा जुनिअर कॉलेज च्या  व्हॉलीबॉल संघाने जिल्ह्या त प्रथम क्रमांक पहिल्यांदाच पटकाविला‌ हे विशेष विजय खेळाडू आपल्या यशाचे श्रेय जुनिअर कॉलेजचे प्राचार्य संदीप डाखरे प्राध्यापक गणेश पावडे व  कर्मचारी तसेच प्रशिक्षक अजिंक्य कावरे पवन अवघडे व्यवस्थापक आशिष बोढे व स्फूर्ती स्पोर्टिंग क्लब चे  पदाधिकारी व ज्येष्ठ खेळाडूंना देतात

Post a Comment

0 Comments