१७ डिसेंबरला पेन्शनर्स डे चे आयोजन

१७ डिसेंबरला पेन्शनर्स डे चे आयोजन

विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांचा तसेच गुणवंतांचा सत्कार केल्या जाणाऱ




वरोरा(प्रती) वरोरा तालुका पेन्शनर्स बहुउद्देशीय असोसिएशन वरोराच्या वतीने दिनांक १७/१२/२०२२रोज शनिवारला दु. १;००वाजता स्थळ- सिद्धिविनायक मंगल कार्यालय पोलीस स्टेशन समोर वरोरा येथे पेन्शनर्स डे(निवृत्तसेवक एकात्मता दिवस )चे आयोजन करण्यात आले आहे ,या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा. प्रतिभाताई धानोरकर ,आमदार वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्र, मा धनराज आस्वले, सेवानिवृत्त प्राध्यापक बेहरीज सामाजिक कार्यकर्ता भद्रावती मा .उषा रडके,लता  मंगेशकर हॉस्पिटल नागपूर, मा शेख जरुद्दीन( छोटू भाई) माजी नगरसेवक न .प वरोरा यांची उपस्थिती राहणार असून मा. मोरेश्वरजी टेंमुर्डे, माजी उपाध्यक्ष विधानसभा ,ना .गो .थुटे कवी, लेखक , माजी मुख्याध्यापक, या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे सदर कार्यक्रमाची कार्यक्रमावली खालील प्रमाणे असून यामध्ये आरोग्य तपासणी शिबिर, अतिथींचा परिचय व सत्कार दहावी बारावीच्या शालांत परीक्षेत प्रथम तीन गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, पत्रकार बंधू सामाजिक कार्यकर्ता यांचा सत्कार व दि.१६/१२/२०२२ रोजी वयाची ९० वर्ष व ७० वर्षे पूर्ण झालेल्या सभासदांचा सत्कार करण्यात येणार आहे, तरी सदर कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन आ.मा. देवाळकर अध्यक्ष ,तु.झा.विरुटकर उपाध्यक्ष, दे.झी. कांबळे सचिव, द.तू. आस्वले सहसचिव ,दे. पा.पारखी कोषाध्यक्ष, सदस्य दि.बा राऊत ,सू.ल. वरवटकर, सी.मा. पाल, ना.ल काळे ,रा.पा कावलकर, व.बा.माणूसमारे श्रीमती शशिकला पोईनकर, श्रीमती सिंधुताई उत्तरवार ,दुर्गा ठाकरे  ,सौ मीरा वानखेडे यांनी केले आहे

Post a Comment

0 Comments