हॅपी क्लास अंतर्गत पाककृती उपक्रम उत्साहात संपन्न

हॅपी क्लास अंतर्गत पाककृती उपक्रम उत्साहात संपन्न




वरोरा (प्रती)लोकमान्य कन्या विद्यालयात वर्ग 10 ब च्या विद्यार्थिनींसाठी  पाककला (Culinary) उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकूण तीस विद्यार्थिनींचा सहभाग होता. प्रत्येकी पाच विद्यार्थिनी एकत्र येऊन सहा समूह तयार करण्यात आले. या विद्यार्थिनींनी स्प्राउट (कडधान्य) भेळ, नाचणी हलवा, बदाम दूध, खमंग ढोकळा,  व्हेजिटेबल मोमोज, फ्रूट केक असे पदार्थ स्वतः तयार करून आणले व निर्मिती प्रक्रियेचे सादरीकरण केले. या उपक्रमात शाळेतील शिक्षिका नीता गोगटे अतिथी म्हणून उपस्थित होत्या. उपक्रम आयोजना मागील उद्देश सुरवातीला विशद करण्यात आला. आरोग्यदायी अन्न (Healthy Food) अशी या उपक्रमाची  संकल्पना होती. शिक्षक आणि वर्गातील विद्यार्थिनींनी सर्व रुचकर पदार्थांचा आस्वाद  घेतला. सर्व शिक्षकांनी सहभागी विद्यार्थिनींचे अभिनंदन व कौतुक केले. या उपक्रमाचे संयोजन हॅपी क्लास प्रकल्प प्रमुख राघवेंद्र अडोणी यांनी केले.

Post a Comment

0 Comments