आज वरोऱ्यात भव्य स्त्री मुक्ती परिषदेचे आयोजन




वरोरा( प्रती)दि.आज २५ डिसेंबर २०२२ रोज रविवारला सकाळी १० वाजता दिक्षाभुमी यात्रा वार्ड वरोरा या पवित्र स्थळी भव्य स्त्री मुक्ती परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे ,या कार्यक्रमाच्या माध्यमातून एका मनुस्मृती नावाच्या ग्रंथाचे स्त्री मुक्ती दिवस म्हणुन दहन करण्यात येणार आहे. दिनांक २५/ १२/ १९२७ या दिवशी प. पुज्य बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण प्राणी मात्राच्या व विशेषतः स्त्री दास्य मुक्तीसाठी या ग्रंथातील अनिष्ट रूढी परंपरा आणि तर्कहीन विचारालाच आग लावली होती. या जुन्या इतिहासाला वरोरा येथे नव्याने उजाळा मिळणार आहे. मनोरंजनाच्या कार्यक्रमासह या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तथा मान्यवर अतिशय मोलाचे मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाचे उदघाटन शोभाताई वेले यांच्या 
हस्ते होनार  असून मा. बनसोडे पुणे यांचे आवेशपूर्ण भाषण, व अँड. योगिताताई रायपुरे,चंद्रपूर यांचेही मोलांचे मार्गदर्शन हे विशेष आकर्षण राहणार आहे. या ढाण्यावाघाच्या डरकाळीची वरोरा व परिसरातील जनता मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहे. तेव्हा तन मन धन सर्वांनी सहकार्य करून मनुस्मृती दहन दिनी विचारवंताच्या विचारांचा लाभ घ्यावा असे आवाहन वंचित बहुजन आघाडी तसेच वंचित बहुजन महिला आघाडी वरोरा यांनीं केले आहे,

Post a Comment

0 Comments