कलीयुगातील आधुनिक श्रावण बाळ

मा.चेतनभाऊ शर्मा यांची वरोरा ते गुरुकुंज आश्रम मोझरी येथे पायीवारी

कलीयुगातील आधुनिक श्रावण बाळ






वरोरा(प्रती) वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचाराने प्रेरित असलेले वरोरा येथील सोन्या-चांदीचे व्यावसायिक तथा सामाजिक कार्यकर्ते चेतनभाऊ शर्मा यांनी कर्मयोगी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी पर्वावर आज दि.२०/१२/२२ रोजी पहाटे ५:३० वाजता  वरोरा येथून प्रस्थान करून गुरुकुंज आश्रम मोझरी साठी पायीवारी सुरू केली आहे त्यांच्या या कार्याला अनेकांनी शुभेच्छा दिल्या असून वडिलांसाठी घेतलेले व्रत ते आज पूर्णत्वास नेत आहेत चेतन शर्मा हे कलियुगातील आधुनिक श्रावण बाळ असल्याचे बोलले जाते चेतन शर्मा हे राष्ट्रसंतांच्या विचाराने झपाटलेल व्यक्तिमत्व सामाजिक चळवळीत जगत असताना अगदी विद्यार्थी दशेतच सामाजिक परिवर्तनाची जाण ठेवत आई-वडिलांचा मानसन्मान, आदर करणे गोरगरीब ,पीडित ,शोषितांना मदत करणे  हे धडे त्यांनी आपल्या वडिलांपासून घेतले वडीलही राष्ट्रसंतांच्या विचाराने प्रेरित असलेले ,आई वडील हे परिवारांसाठी आधारस्तंभ असतात आधारस्तंभ खचला किंवा परिवारातून निघून गेला तर कुटुंबाला किती हालअपेष्टा भोगावे लागतात हे आपण उघड्या डोळ्यांनी समाजात पाहतो अशीच एक घटना चेतनभाऊ यांच्या  परिवारात घडली वडील चंदनलाल शर्मा हे२०१२ मध्ये आजारी पडले दोन्ही भावंडे वडिलांच्या आजारमुळे खचले होते , परंतु वडिलांसाठी वाटेल ते करायला तयार होते वडील आजारातून लवकर बरे व्हावे यासाठी त्यांची धडपड सुरू होती काही दिवसांनी त्यांच्या प्रयत्नाला अखेर यश आले वडील आजारातून पूर्णता बरे न होता काही प्रमाणात बरे झाले आणि चालायला लागले तेव्हा चेतनभाऊ यांनी माझे वडील आजारातून मुक्त झाल्यास मी वरोरा ते गुरुकुंज आश्रम मोझरी येथे पायीवारी करेल असा संकल्प त्यांनी केला होता आणि आज तो संकल्प घेतलेले व्रत त्यांनी पूर्ण केले आहे वरोऱ्याच्या इतिहासात ही पहिलीच घटना असल्याचे बोलल्या जात आहे,

 आजच्या आधुनिक विज्ञान युगात प्रत्येक जण स्वार्थीपणाचे जीवन जगत आहे, गाडी ,घोडी माडी याच्यातच वावरतांना दिसतो आई-वडील भाऊ-बहीण आणि इतर नातेवाईकांचा विचार न करता स्वतःच्या स्वार्थासाठी जगतांना दिसतो 
 समाजातुन  श्रावणबाळ  हे नाव इतिहास जमा झाले आहे,आज घडीला दिसत नाही आपल्या अंध आई-वडिलांसाठी त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी श्रावण बाळांनी उपसलेले कष्ट त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी  आपल्या अंध आई वडिलांना तीर्थयात्रेला घेऊन जाणे ही बोध कथा आज चेतनभाऊ यांच्या या कार्याला पाहून अधोरेखित झाल्याचे बोलले जाते

Post a Comment

0 Comments