वनोजा येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त "सत्कार समारंभ" आणि रंगश्याम मोडक यांनी लिहिलेल्या "आदिवासी कोलाम समाज" या पुस्तकाचे प्रकाशन

वनोजा येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त "सत्कार समारंभ" आणि रंगश्याम मोडक यांनी लिहिलेल्या "आदिवासी कोलाम समाज" या पुस्तकाचे प्रकाशन

         

वरोरा(प्रती) ग्रामपंचायत वनोजा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथीच्या कार्यक्रमानिमित्त दिनांक 25 डिसेंबर ते 28 डिसेंबर पर्यंत कार्यक्रम करण्यात आले या कार्यक्रमासाठी सकाळी , सामुदायिक प्रार्थना प्रभात फेरी दुपारी वैचारिक पर भाषणे सायंकाळी प्रबोधन पर नाटके, कीर्तन आणि भारुडे यांचा भरगच्च कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी गावातील व  आजूबाजूच्या खेड्यातील लोकांनी, श्रोत्यांनी हजेरी लावली होती.
            दि.28/12/2022ला रंगशाम संभाजी मोडक यांनी लिहिलेल्या "आदिवासी कोलाम समाज" या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले या प्रकाशासाठी सन्माननीय आदरणीय लक्ष्मणरावजी गमे माननीय कावळे सर, मा. तागड महाराज, मा. अरविंदजी पारखी मा. कमलाकरजी मते तथा लेखकाच्या आई रेवताबाई मोडक उपस्थित होते.
         सत्कार आणि सत्कारमूर्ती आदरणीय लक्ष्मणरावजी गमे यांच्या सत्कार करण्यामागील परिचय करून देत असताना मा. कमलाकरजी मते म्हणतात की, आदरणीय लक्ष्मणरावजी गमे यांनी आमच्या गावात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाला सुरुवात केली. 1974 पासून तर आजतागायतपर्यंत हा कार्यक्रम या गावात दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये हा सुरू आहेत आणि तो नित्यनेमाने सुरू आहेत. या कार्यक्रमाचे सर्व श्रेय मार्गदर्शक, प्रेरणादाता आदरणीय लक्ष्मणरावजी गमे हेच आहेत. या गावातीलच लोकांना वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराने प्रेरित केले असे नसून आजूबाजूच्या गावात देखील वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार आजच्या ग्रामाला आणि ग्रामाचा विकास करण्यासाठी खेड्याची उन्नती करण्यासाठी किती फायदेशीर आहेत हे पटवून दिलेले आहेत त्यामुळे आजूबाजूच्या सर्व परिसरात आज गुरुदेव सेवा मंडळ स्थापन करण्यात आले असून त्या ठिकाणी नित्यनेमाने सामुदायिक प्रार्थना घेण्यात येत आहेत. एवढे मोठे कार्य मंचावरील उपस्थित आदरणीय लक्ष्मणरावजी गमे यांच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा दिवसेंदिवस लोक मनावर प्रतिबिंबित होत आहे. वनोजा या गावातील त्यांनी गुरुदेव सेवा मंडळ यांचे अध्यक्षपद सांभाळले आहे. तर मागील वीस वर्षापासून वरोरा येथे स्थापन करण्यात आलेल्या गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्षपद्य भूषवित आहेत. त्यांच्या कार्याची आणि एकाच पदावर भूषवण्यात येण्याची महानता, सहनशीलता, सामाजिक जाणीव आणि समाजातील सर्वांच्या भावनांना सन्मान देण्याची मानसिकता, जबाबदारीने कार्य करण्याची कर्तव्यनिष्ठा हे वैशिष्ट्य त्यांच्या आचरणात आणि वागणुकीतून दिसून येते.  व्यक्तीने एक पद भूषवावं यांची परिमिती किती असावी ती सांगताना  म्हणतात  की वरोरा येथे फ्रेंड्स गणेश क्लब या नावाने गणपती उत्सव मंडळ स्थापन करण्यात आला होता. मागील 30 तब्बल तीस वर्ष ही व्यक्ती त्या फ्रेंड्स गणेश क्लब ची अध्यक्षपद भूषवलेली आहेत. एखाद्या संघटनेमध्ये,  ज्या संस्थेमध्ये एकाच व्यक्तीने ते पद भूषवावे त्यासाठी ते अधिकारी आणि अध्यक्ष किती प्रभावीपणे स्वतः राबले पाहिजे आणि त्यास संस्थेतील सदस्यांच्या सर्व सदस्यांच्या भावनांना जपणारे, इतरांच्या विचाराचा मानसन्मान करणारी व्यक्ती आम्हाला पाहिजे.अशी व्यक्ती आमच्या गावात आहेत ती म्हणजे आदरणीय लक्ष्मणरावजी गमे। यांचा आज आम्ही सत्कार करण्याचे ठरवलेले आहेत कारण ती सत्कारात पात्र आहे एवढेच नसून आज काही दिवसाच्या अगोदरच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी स्वतः स्थापन केलेल्या गुरुकुंज मोझरी येथे गुरुदेव सेवा मंडळाच्या अध्यक्षपदी आणि सर्वेसर्वा या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील बरोरा तालुक्यातील आणि या वनोजा गावातील लोकांसाठी मोठी अभिमानाची आणि स्वाभिमानाची बाब आहे.
    या परिचयानंतर आदरणीय लक्ष्मणरावजी गमे यांचा सत्कार शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला. गावातील एक लेखक या नात्याने  मंचावरील रंगशाम  मोडक यांचा देखील शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर रंगश्याम संभाजी मोडक यांच्या "आदिवासी कोलाम समाज" या पुस्तकाचे प्रकाशन सोहळ्यामध्ये आजच्या कार्यक्रमाच्या सत्कारमूर्ती आणि ज्यांच्या शुभहस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले असे आदरणीय लक्ष्मणरावजी गमे पुस्तकाच्या प्रकाशन संबंधी म्हणतात, रंगश्याम मोडक यांनी 1974 मध्ये जे गुरुदेव सेवा मंडळ वनोजा येथे स्थापत करण्यात आलेले होते त्या कार्यक्रमासाठी सामुदायिक प्रार्थनेचा हा दररोज सायंकाळी होणाऱ्या कार्यक्रमाचे व्यवस्थापन न चुकता त्यांनी केले होते ही जबाबदारी त्यांनी सांभाळली होती . रंगशाम मोडक यांचे अक्षर सुंदर आहेत या सुंदर अक्षराचा ठसा पुण्यतिथीच्या दिवसात गावातील सर्व भिंतींना बोलकी करण्याचे काम करून नवीन ठसा उमटवून ठेवला होता. ग्रामगीतातील ओवींना भिंतीवर घराघरावर नोंदवून त्यांनी हे काम सामाजिक जाणिवेने पूर्ण केले होते. रंगश्याम मोडक यांनी मिळवलेल्या शिक्षण क्षेत्रातील पदवी पाहून असं वाटते की आपल्या गावात यांच्या एवढा शिकलेला दुसरा कोणी नसेल. या गावामध्ये प्रथम डॉक्टरेट झालेला आणि आपल्या गावातील आद्य कवी, लेखक म्हणून या गुरुदेव सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी यांचा सन्मान केला की अतिशय आनंदाची बाब आहे.
    पुस्तकाचे प्रकाशन झाल्यानंतर रंगश्याम मोडक आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले ज्या मातीत माझा जन्म झाला या मातीने मला खूप शिकवलं या लोकांनी या लोकांपासून मी खूप शिकलो अशा या लोकात आणि याच मातीत ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मी वाढलो त्या आजच्या सत्कारमूर्ती आदरणीय श्री लक्ष्मणराव जी गमे यांच्या शुभहस्ते आणि या मातीत माझ्या वनोजा या गावात माझ्या पुस्तकाचे प्रकाशन व्हावं माझा आनंद द्विगुणीत करणारा असून जीवनातील अविस्मरणीय क्षण आहे. 
        राष्ट्रसंताविषयी मत मांडत असताना म्हणतात की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तमाम बहुजन समाजाला जो 3684 जातीतील विखुरला होता अशा बहुजन समाजाला एकत्रित करण्यासाठी भारतीय संविधानात कलम 340 नमूद करून  ओबीसी या एका छत्राखाली बांधण्याचं काम केलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मात्र याही पुढे जाऊन ग्रामगीतेमध्ये सिख, बौद्ध, हिंदू ,मुस्लिम, जैन, पारशी व  क्रिस्त या सर्व धर्मातील लोकांनी सामुदायिक प्रार्थनेच्या माध्यमातून एकत्र आणण्याचे काम केले. सामुदायिक प्रार्थना याच्या माध्यमातून गावाचा विकास कशा पद्धतीने करता येईल याबद्दल विचारमंथन करावे आणि कार्य करावे यासंबंधीचे मार्गदर्शन आणि कार्यविचार राष्ट्रसंतांनी मांडले आणि ती प्रत्यक्ष कार्य करण्यासाठी सामुदायिक प्रार्थना ही बैठक आपणापुढे ठेवली. यातून राष्ट्रसंतांनी हे सर्व धर्मांना एकत्रित जोडण्याची काम करीत होते म्हणूनच त्यांना समधर्मसमभावाचे खंदे पुरस्कर्ते ठरतात. या विचाराने भारतीय संविधानातील धर्मनिरपेक्षपणा या तत्त्वाला दृढता प्राप्त झाली आहे. 
     आदिवासी कोलाम समाज यासंबंधी बोलताना रंगशाम मोडक म्हणतात, चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती आणि कोरपणा या तालुक्यात वास करणारा कोलाम समाज अजूनही विकास, प्रगती व साहित्य क्षेत्रापासून दूर होता. यांचे कुठलंही साहित्य अभ्यासाला दिसत नाही. त्यामुळे मी आदिवासी कोलाम समाज यांच्याबाबतची रितीरिवाज, प्रथा, परंपरा, त्यांच्या चालीरीती, संस्कार, व्यवसाय, याबाबतची सर्वांगीण माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला आणि ती माहिती या पुस्तकाच्या माध्यमातून आपणांसमोर, वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहेत. वास्तविक पाहता यवतमाळ जिल्ह्यामध्ये राहणारे कोलाम यांचा अभ्यास डॉ. भाऊ मांडवकर यांनी केला असला तरी या कार्याला आज 55 वर्ष होत आहेत यानंतर मात्र दीर्घोत्तरी असे कार्य कोणीही केलेले नाहीत. विशेष सांगायचे म्हणजे की, यवतमाळ जिल्ह्यातील कोलाम आणि जिवती तालुक्यात, पहाडावर असणारे कोलाम यामध्ये संस्कृतीच्या आणि देवाच्या बाबतीत थोडेफार अंतर जाणवते. त्यामुळे मी अतिशय बारकाईने या पुस्तकात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहेत. मला आशा आहे,  की वाचक वर्ग माझ्या पुस्तकाचे स्वागत करतील यासोबतच या पुस्तकाच्या प्रकाशनसाठी मला या मंचावर जे स्थान मिळवून दिलं त्याबद्दल मी गुरुदेव सेवा मंडळाच्या सर्व पदाधिकारी आणि विशेषतः श्री. कमलाकरजी मते व इतर कार्यकर्त्यांचे आभार मानतो, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन वैशाली सातपुते यांनी केले.

Post a Comment

0 Comments