आनंद मूकबधिर विद्यालयात जागतिक दिव्यांग दिन साजरा

आनंद मूकबधिर विद्यालयात जागतिक दिव्यांग दिन साजरा 


   
वरोरा(प्रती)  दिव्यांगाच्या समस्यांना वाचा फोडता यावी आणि त्यांच्यासाठी भरीव  कार्य करता यावे याकरिता दरवर्षी 3 डिसेंबरला जागतिक स्तरावर  दिव्यांग दिन साजरा करण्यात येतो. आनंद मूकबधिर विद्यालय आनंदवन येथेसुद्धा जागतिक दिव्यांग दिन  संपन्न झाला.या कार्यक्रमाला अतिथी म्हणून आनंदवन ग्रामपंचायतचे उपसरपंच मान. शौकत खान व शाळेतील सेवानिवृत्त शिक्षक व योगगुरू श्री. दीपक शिव, वसतीगृहअधिक्षक श्री.अमोल दशमुख व लेखापाल श्री. युवराज कडनाके हे उपस्थित होते व कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मान. विजय भसारकर, मुख्याध्यापक यांनी भूषविले.वाचाउपचार तज्ज्ञ श्री.रविकांत घोलप व कलाशिक्षक श्री.प्रल्हाद ठक यांनी दिव्यांग दिनाची माहिती विद्यार्थ्यांना दिली. श्री.देवडे सर यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. कु. सीमा बावणे यांनी सांकेतिक भाषेत मुलांपर्य॔त कार्यक्रम पोहचविण्याचे काम केले तर सूत्रसंचालन श्री. उमेश घुलक्षे यांनी केले.
       या कार्यक्रमाची सुरवात स्वतः कर्णबधिर व अंध असूनही शिक्षण क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणा-या डाॅ. हेलन  केलर व अंधाकरीता वरदान ठरलेल्या ब्रेल लिपीचे जनक लुई ब्रेल यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी साखळी पद्धतीने कर्णबधिरत्वाचे प्रतिक चिन्ह तयार केले. या प्रसंगी विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या व छोटी नाटीकाही सादर करण्यात  आली . विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली. 
        या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव मा.डाॅ.विकासभाऊ व भारतीताई आमटे यांचे आशीर्वाद तर मान. कौस्तुभदादा व पल्लवीताई आमटे यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments