बब्या तडीपार; इतर गुन्हेगार हिट लिस्टवर

बब्या तडीपार
इतर गुन्हेगार हिट लिस्टवर





वरोरा(प्रती)वरोरा पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हेगार वृत्तीच्या गुन्हेगारावर आळा बसावा याकरिता  गुन्हेगार वृत्तीच्या काही गुन्हेगारावर हद्दपार करण्याचा निर्णय  पोलीस स्टेशन वरोरा  यांनी घेतला आहे , अशाच गुन्हेगार वृत्तीचा इसम नामे अमोल उर्फ बब्या हिरामण लोखंडे रा.दत्त मंदिर वॉर्ड वरोरा याच्यावर जबरी  गुन्हे नोंद असल्याने हद्दपारीची कारवाई करण्यात आली , सदर इसम हा एकोणा येथून कोळसा वाहतूक करणारे ट्रकांना थांबवून त्यांचे कडून पैसे घेऊन शहरातून प्रवेश देत असल्याबाबत पोलिसांना गोपनीय माहिती प्राप्त झाली होती अशा गुन्हेगार वृत्तीच्या इसमास चंद्रपूर जिल्ह्याचे स्थळ सीमेतून  उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा यांचे आदेशाने त्याला हद्दपार करण्यात आले आहे सदर इसम वरोरा किंवा चंद्रपूर जिल्ह्यात आढळून आल्यास पोलीस स्टेशन वरोरा येथे संपर्क साधावा असे आव्हान सुद्धा करण्यात आले,इतर गुन्हेगार प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर  हद्दपार करण्याची कार्यवाही सुरू आहे  सुरू असल्याची माहिती मिळाली सदरची कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू उपविभागीय पोलिस अधिकारी आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली आहे

Post a Comment

0 Comments