नववर्षाचे पूर्वसंध्येला वरोरा पोलीसांची मोठी कारवाई :रेती तस्करी ; २ कोटी ५ लाखाचा मुद्देमाल जप्त

नववर्षाचे पूर्वसंध्येला वरोरा पोलीसांची मोठी कारवाई

रेती तस्करी

२ कोटी ५ लाखाचा मुद्देमाल जप्त



वरोरा(प्रती)पो. स्टे वरोरा हद्दीतील वर्धा नदीच्या करंजी घाटामध्ये शासकीय नियमांना बगल देत पोकलॅन्ड मशिनद्वारे अवैधरित्या रेती या गौण खनिजाचे उत्खनन सुरू असल्याची माहिती आयुष नोपानी (IPS)सहाय्यक पोलिस अधिक्षक, तथा उपविभागिय पोलीस अधिकारी वरोरा यांना गोपनिय सूत्रांकडून मिळाली असता त्यानुसार दि. ३१/१२/२०२२ रोजी पो.स्टे. वरोरा येथील सपोनि । निलेश चवरेयो हवा। मुनेश्वर, नडे, नितीन, सचिन, सुशांत तसेच सुर, पो-स्टे माजरी येथील सपोनि देवरे, भद्रावती येथील पोलीस कर्मचारी , उपविभागिय पोलिस अधिकारी, वरोरा येथील पोलिस कर्मचारी यांना बोलवून त्यांचे मदतीने छापा टाकला असता वर्धा नदीचे पात्रात दगड आणि मुरूम टाकून नदीचे पाणी दूषीत करीत व पाण्याचा प्रवाहाची दिशा बदलवून दोन पोकलैन्ड मशिनचे साहाय्याने नदी पाञातील रेतीचा उपसा करतांना व मा. जिल्हादंडाधिकारी, चंद्रपूर यांचे आदेशाचे उलंघन करून नदीपात्रातील रेतीची चोरी करन्याचा प्रयत्न करित असतांना दोन पोकल्ड ,ऑपरेटर आणि ६ हायवा ट्रकचे चालक घटनास्थळी वाहनांसह मिळून आले. चालकांनी कासिफ खान आणि प्रदिप घागी यांचे सांगणेप्रमाणे ते कृत्य करित असल्याचे सांगीतले असून घटनास्थळावरून दोन पोकलेन्ड मशिन आणि ६ हायवा ट्रक असा एकूण २,०५,००,०००/- रुपये (दोन कोटी पाच लख रुपये) चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी विरुद्ध कलम ३७९, ५११, ४३०, ४३१, १०९, १९६, ३४ भादंवी सहकलम ४८ (७) (C) म.ज.म. १९६६ प्रमाणे सपोनि निलेश चौरे यांचे तक्रारीवरून पो स्टे वरोरा येथे गुन्हा नोंद करन्यात आला असून अधिक तपास वरोरा पोलिस करित आहेत. सदरची कार्यवाही मा. श्री. रविंद्रसिंह परदेशी, पोलीस अधिक्षक, चंद्रपूर आणि श्री. आयुष - नोपानी सहाय्यक पोलीस अधिक्षक, वरोरा यांचे मार्गदर्शनाप्रमाणे करण्यांत आली आहे.

Post a Comment

0 Comments