शेतकरी धडकणार ३१ ला वरोरा तहसील कार्यालयावर

शेतकरी धडकणार ३१ ला वरोरा तहसील कार्यालयावर

रमेश राजूरकर करणार नेतृत्व
वरोरा(प्रती)
 कापूस, सोयाबीन या शेतमालाची आयात थांबवून निर्यातीबाबत त्वरित निर्णय घ्यावा,  स्वामीनाथन आयोग सुरु करा, शेती खर्चाच्या दीडपट भाव शेतकऱ्यांना द्यावा, पीक विमा त्वरित द्यावा, शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट करू नये, शेतमालावरील वायदेबंदी उठवावी,शेती कामानंतर शेतमजुरांना रोजगार द्यावा या व अन्य मागण्यांना घेऊन वरोरा येथील तहसील कार्यालयावर ३१ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता सर्व पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांचा मोर्चा धडकणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते रमेश राजूरकर, किशोर डुकरे हे करणार आहेत. मोर्चात डाॅ. विजय देवतळे, जयंत टेमुर्डे, बाळू भोयर, विजय मोकाळी, विशाल पारखी, अविनाश ढेंगळे सुरेंद्र देठे, प्रशांत बल्की आदी सहभागी होणार आहेत. मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या आहे मागण्या
कापूस, सोयाबीन पीकांवरील आयात थांबवून निर्यातीबाबत निर्णय मागे घ्यावा, ज्यांनी पीक विमा काढला आहे, त्या  शेतकऱ्यांना आठ दिवसांत पूर्ण रक्कम द्यावी, वायदे बंदी उठवावी. शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट करू नये, कर्ज माफीचा लाभ द्यावा, खर्चाच्या दीड पट भाव द्यावा, वीज डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना त्वरित वीज जोडणी द्या, स्वामीनाथन आयोग लागू करा, ऑनलाईन सात, बारातील चुका दुरुस्ती करा, ई-पिक पाहणी पटवारी किंवा ग्रामसेवकांमार्फतच करा.

नैसर्गिक आपत्ती, वाढती महागाई यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहे. शेतकरी जगला तरच आपण जगणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागण्यांना घेऊन सर्व पक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे. शेतमालाला भाव द्यावा,  स्वामीनाथ आयोग लागू करावा  आदी मागण्या असून शासनाचे लक्ष वेधून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हा मोर्चा आहे.

Post a Comment

0 Comments