परमानंद तिराणिक यांना गोवा सरकारचा "राष्ट्रीय कला शिक्षक सन्मान पुरस्कार "

परमानंद तिराणिक यांना गोवा सरकारचा
"राष्ट्रीय कला शिक्षक सन्मान पुरस्कार "
   


              

 वरोरा(प्रति) २९ जानेवारी २०२३ गोवा मालवण येथे कला व सांस्कृतिक संचालनालय ,गोवा सरकार ,पर्यटन व सांस्कृतिक समिती मंत्रालय विभाग गोवा यांच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा पुरस्कार .कला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल कलाशिक्षक परमानंद तिराणिक यांना "राष्ट्रीय कला शिक्षक सन्मान पुरस्कार " २०२३ चा जाहिर झाला आहे.सदर पुरस्कार सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते,स्वराज्य संभाजी फेम ,मा.अनिल गवस व गोवा राज्याचे कला ,क्रीडा व सांस्कृतिक ग्रामीण विकास मंत्री मा.ना.गोविंद गावडे यांच्या शुभहस्ते मालवणच्या कला नाट्य् उत्सवामधे प्रदान केला जाणार आहे.परमानंद तिराणिक यांनी " संविधानाची उद्देशिका "हा लोकजागराचा सामान्य लोकांपर्यंत प्रसार व्हावा म्हणून पन्नास पैशाच्या पोस्टकार्डावर स्वहस्ताक्षरात भारतीय संविधानाची माहिती प्रत्येक शाळेशाळेत देवून जनजागृती केली.तसेच "वारली चित्रकला"ही कला बाह्यव्हरांड्यातील शाळेच्या भिंतीवर रेखाटल्या जावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला.गेल्या २६ वर्षापासून ते कला व सामाजिक क्षेत्रांत कार्यरत आहेत.त्यांनी दिलेल्या कलाक्षेत्रातील योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार जाहिर झाला आहे.याआधी त्यांना भद्रावती भूषण पुरस्कार ,आचार्य पुरस्कार ,आदिवासी राष्ट्रीय कला समाजसेवक पुरस्कार ,महाराष्ट्र प्राईड आॕफ अवाॕर्ड,युथ आयकाॕन अवाॕर्ड,विदर्भरत्न पुरस्कार अशा विविध शेकडो पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहेत .

Post a Comment

0 Comments