खेमजई येथे दिनदर्शिका प्रकाशन व सत्कार सोहळा.

खेमजई येथे दिनदर्शिका  प्रकाशन व सत्कार सोहळा.


क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती 



वरोरा (प्रती)वरोरा तालुक्यातील खेमजई येथे सावित्रीबाई फुले जयंती निमित्त दिनदर्शिका प्रकाशन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. प्रमोद गंपावार सामाजिक कार्यकर्ता, कार्यक्रमाचे उदघाटक  प्राचार्य डॉ. पुरुषोत्तम कालभूत वरोरा, प्रमुख पाहुणे माजी सभापती कन्हैयालालजी जैस्वाल,सरपंच मनीषा चौधरी,उपसरपंच चंद्रहास मोरे,डॉ.सतीश अघडते, पशुधन विकास अधिकारी, अविनाश मेश्राम, ठाणेदार पोलीस स्टेशन शेगाव (बु.),विश्वानाथ तुराणकर, पोलीस पाटील खेमजई, शंकर धोत्रे तंटामुक्ती अध्यक्ष, माजी सरपंच रमेश बावणे, भाऊराव दडमल इत्यादी उपस्थित होते.
.खेमजई ग्रामस्थांवर राष्ट्रीय सेवा योजनेचा प्रभाव कायम आहे. येथील युवक गावं विकासासाठी पुढे आले व गावाचा कायापालट केला असे मत डॉ. कालभूत यांनी व्यक्त केले.
खेमजई दिनदर्शिका हे खेमजई गावाचा विकास आराखडा दर्शविणारी माहिती पुस्तिका आहे.गावाची दिनदर्शिका हा नावीन्य उपक्रम आहे असे अध्यक्षीय भाषणात डॉ. गंपावार यांनी व्यक्त केले 

मान्यवरांच्या हस्ते दिनदर्शिका 2023   चे प्रकाशन करण्यात आले.
खेमजई येथे उत्कृष्ट कार्य करणारे डॉ. सतीश अघडते पशुधन विकास अधिकारी, राठोड,लुथडे पोस्ट मास्तर, रोशन डब्बाला पोस्ट मन यांचा खेमजई ग्रामपंचायत कडून सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश चौधरी यांनी केले तर संचालन शीतल साळवे यांनी तर आभार प्रदर्शन माधुरी निब्रड यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगेश कोहळे, सुरेश तपासे, शेषराव चौधरी, अशोक दडमल, विजय निब्रड, भगवंत नन्नावरे, विनायक बावणे इत्यादीने परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments