भरधाव वेगात येणाऱ्या चार चाकी वाहनाची दुचाकीस्वारांना धडक

भरधाव वेगात  येणाऱ्या चारचाकी वाहनाची दुचाकीस्वारांना धडक  

चार जखमी  



वरोरा(प्रती) नागपूर वरून चंद्रपूर कडे जाणाऱ्या एका चारचाकी वाहनाने दोन दुचाकींना धडक दिली असता चार जण जखमी झाले यामध्ये दोन महिलांचा समावेश असून सदर घटना आज दि.५/१/२३रोजी रात्री ७:००वाजताच्या दरम्यान रत्नमाला चौक वरोरा येथे घडली ,
नागपूर वरून चंद्रपूर कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकी वाहन क्र .एम एच३१एफ इ ४५५२ क्रेटा या गाडीने दोन दुचाकीला जबरदस्त धडक दिली असता दुचाकीवरील सपना दिलीप उपरे (४०)वरोरा ,सुनिता देवराव ढवस (३५) जिल्हा वर्धा, देवरावजी भोयर (४० ) डोंगरगाव रेल्वे ,दिलीप उपरे(५०)वरोरा हे जखमी झाले, जखमींना उपजिल्हा रुग्णालय येथे भरती करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहे,
 नागपूर  वरून येणारे  क्रेटा वाहन इतके भरधाव होते की काही सेकंदात दुचाकीस्वारांना उडवून ते चंद्रपूर मार्गे भरधाव वेगाने निघून गेले, परंतु पुढील नंदोरी टोल नाक्यावर त्या वाहनाला पकडण्यात आले असल्याची माहिती मिळाली,असून चालकाला अटक करण्यात आली,
 वारंवार होणाऱ्या चौकातील अपघातामुळे वाहतूक सिग्नल लावण्यात यावे,अशी अपघातदारम्यान जनतेकडून मागणी होत होती,

Post a Comment

0 Comments