गांधीचे विचार कृतीत उतरवण्याची गरज- गजानन हरणे.

गांधीचे विचार कृतीत उतरवण्याची गरज-  गजानन हरणे.                                       





अकोला(प्रती) आज गांधीजीला जाऊन किती वर्ष झाले तरी अजूनही गांधी संपवण्याचा  प्रयत्न करणाऱ्याना महात्मा गांधीजीला संपवता येत नसून ऊलट हा गांधी व त्यांचे विचार संपूर्ण जगात पोहोचले असून आजच्या तरुणांनी गांधीचे विचार कृतीत उतरण्याचे गरज असल्याचे प्रतिपादन गजानन हरणे ज्येष्ठ समाजसेवक तथा संयोजक निर्भय बनो जनआंदोलन यांनी नेहरू युवा मंडळ देऊळगाव च्या वतीने आयोजित गांधीजीच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला संबोधताना केले. कार्यक्रमाचे प्रमुखवक्ते म्हणून गजानन हरणे यांनी "महात्मा गांधी आजचा युवक "या विषयावर व्याख्यान देऊन युवकांचे मन जिंकले तसेच महात्मा गांधीच्या प्रतिमेचे पूजन व  हारअर्पण करून त्यांना आदरांजली वाहली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. विकास हागे, तर प्रमुख उपस्थितीमध्ये  डॉ.नयना मोरे, गणेश गावंडे, शेख सलीम भाई, धम्मपाल गवई, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन निलेश काळमेघ तर आभार प्रदर्शन संजीवनी गावंडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरता नेहरू युवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला युवक, युवती, महिला व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.     

Post a Comment

0 Comments