राज्यगीत सादर करून अंधशाळेत "शिवजयंती" साजरी

राज्यगीत सादर करून अंधशाळेत "शिवजयंती" साजरी
                


   वरोरा (प्रती)     आनंद अंध विद्यालय आनंदवन येथे प्रथमच राज्यातील शाळांमध्ये "शिवजयंती" चा कार्यक्रम साजरा होत असताना अंध शाळेतील विद्यार्थ्यांनी "जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा" हे स्फुर्तीदायक गीत 'राज्यगीत' म्हणून सामुहिकरीत्या गायन केले. या गीताला वाद्य संगीतावर साथ संगीत शिक्षक श्री.आत्राम सर यांनी दिली. 
           यावेळी अंध शाळेचे, मुख्याध्यापक सेवक बांगडकर व कलाशिक्षक परमानंद तिराणिक यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले गेले. अंध विद्यार्थ्यांना शिवजयंती बद्दल कलाशिक्षक परमानंद तिराणिक यांनी पुढील सविस्तर माहिती सांगितली. ते म्हणाले शिवजयंतीची सुरुवात १८६९ साली महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगड येथील समाधी शोधून काढली व त्यांच्यां जीवनावर सर्व प्रथम प्रदिर्घ पोवाडा लिहिला गेला. रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीची व्यवस्था सरकारने स्वत:कडे घ्यावी असा अर्ज ज्योतीबांनी केला होता. १८७० साली महात्मा फुले यांनी पुणे येथे पहिली 'शिवजयंती' साजरी केली. त्यानंतर शासनस्तरावर जयंती साजरी करण्याचे ठराव संमत करून आज सर्व ठिकाणी मोठ्या जल्लोषात नवतरूणाई 'शिवजयंती' साजरी करू लागले, असे ते म्हणाले.
         या जयंती उत्सव कार्यक्रमाला अंध शाळेतील शिक्षिका तनुजा सव्वाशेरे, वर्षा उईके, राकेश आत्राम, रमेश पप्पुलवार, जितेंद्र चुदरी, स्वामी विवेकानंद युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष- जितेश कायरकर व उपाध्यक्ष शुभम दौलतकर प्रामुख्याने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments