आचार्य ना. गो थुटे साहित्य पुरस्कार व कविसंमेलन



वरोरा (प्रती
)सूर्यांश साहित्य सांस्कृतिक मंच चंद्रपूर शाखा - वरोरा च्या वतीने दि 5 मार्च 2023 रोजी 10 वाजता,स्थळ- शेतकरी भवन जि. प शाळेच्या बाजूला माढेळी ता. वरोरा येथे आचार्य ना. गो थुटे साहित्य पुरस्कार व निमंत्रितांचे कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे
प्रथम सत्र सकाळी 10 वाजता असून या सत्राच्या अध्यक्षा डॉ. प्रा पद्मरेखा धनकर, प्रख्यात कवयित्री व स्तंभ लेखिका हे राहणार असून कार्येक्रमाचे उदघाटन मा. करण देवतळे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, विशेष अतिथी, प्रकाशजी मुथा, माजी बांधकाम सभापती जीं. प चंद्रपूर, प्रमुख अतिथी आचार्य ना. गो थुटे ज्येष्ठ साहित्यिक वरोरा, मा. रमेशजी राजूरकर, उदयोजक वरोरा, व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत
द्वितीय सत्र - कविसंमेलन दुपारी 2वाजता असून या कविसंमेलनाचे अध्यक्ष डॉ. सुधीर मोते ज्येष्ठ साहित्यिक भद्रावती, हे राहणार असून प्रमुख अतिथी मा. धनंजय साळवे गट विकास अधिकारी गडचिरोली, मा. इरफान शेख प्रसिद्ध कवी, मा. प्रदीप देशमुख, सुप्रसिद्ध कवी चंद्रपूर यांची उपस्थिती राहणार असून या कवी संमेलनाचे संचालन. स्वप्नील मेश्राम तर आभार प्रदर्शन विजय भसारकर करतील तरी सदर कार्येक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे,

Post a Comment

0 Comments